शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

हात मिळवण्याच्या पद्धतीवरून मिळेल तुमच्या आरोग्याची माहिती, वाचा तज्ञ काय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:22 IST

जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत हस्तांदोलन करत असेल तर त्यावरून तुम्ही समोरील व्यक्तीच्या आरोग्याविषयी माहिती करुन घेऊ शकता.

Handshake and Health : जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत हस्तांदोलन करत असेल तर त्यावरून तुम्ही समोरील व्यक्तीच्या आरोग्याविषयी माहिती करुन घेऊ शकता. पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?  त्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊया. 

खरं तर हस्तांदोलन केल्यास एखाद्या व्यक्तीच्या शारिरिक स्वास्थाबद्दल अंदाज लावता येऊ शकतो, असं तज्ञाचं मत आहे. एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देताना, त्याचे आभार मानताना किंवा बऱ्याच कालावधीनंतर त्या व्यक्तीला आपण भेटल्यानंतर हस्तांदोलन करतो. हात मिळवण्याची ही कृती जरी सामान्य वाटत असली तरी विज्ञानानूसार अशी कृती केल्यास कोणाच्याही शारिरिक सुदृढतेबाबत तुम्हाला प्राथमिक अंदाज घेता येऊ शकतो. 

ह्रदविकाराचा धोका, स्मृतीभ्रंश किंवा जर एखादी व्यक्ती वारंवार अपसेट राहत असेल तर हस्तांदोलन केल्याने समोरील व्यक्तीचे शरीर एक विशिष्ट प्रकारचा सिग्नल देते. 

क्वीन मेरी येथील हार्वे इंस्टिट्यूटचे प्राध्यापक स्टीफन पीटरसन यांच्या म्हणण्यानूसार, हस्तांदोलन करण्याची पद्धत हृदयविकाराचा धोका असलेल्या लोकांना ओळखण्यास मदत करते शिवाय यामुळे समोरील व्यक्तीवर लवकरच उपचार करून  रोगाचे निदान करता येऊ शकते.  

डिप्रेशन : आरोग्यतज्ञांनूसार, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण डिप्रेशनचे शिकार होतात. जे लोक डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त असतात, त्या व्यक्तीची हस्तांदोलन कराताना हाताची पकड ही सैल असते.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसीनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानूसार कमकुवत हाताची पकड असलेले लोक नैराश्याचे बळी असतात. खरं तर, नैराश्याने ग्रस्त लोक अनेकदा थकल्यासारखे आणि कमजोर वाटतात. ज्यांची हाताची पकड कमजोर असते असे लोक नैराश्याला बळी पडतात. अशी माणसं ज्या वेळी हस्तांदोलन करतात  तेव्हा त्यावेळेस त्याच्या स्वास्थाबद्दल तुम्ही अंदाज लावू शकता

स्मृतीभ्रंश : 'Chemist4U' चे फार्मासिस्ट इयान बड यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ज्या व्यक्तीच्या हाताची पकड कमजोर असेल तर त्या व्यक्तीचे शारिरिक स्वास्थ कमजोर आहे, असे समजले जाते.

हाइपरहाइड्रोसिस : एखादे काम केल्यानंतर जर शरीरातून घामाच्या धारा वाहत असतील तर त्यास हायपरड्रोसिस म्हणतात. हायपरहाइड्रोसिसमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जे नैराश्य, तणाव किंवा इतर काही समस्या शरीरात वाढण्याचे संकेत देत असतात. 

मृत्यूचा धोका :  १९५१  ते १९७६ दरम्यान केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या लोकांची हाताची पकड कमकुवत आहे त्यांचा मृत्यू लवकर होऊ शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांची हाताची पकड मध्यम वयात कमकुवत होते त्यांना हृदय, श्वसनाचे आजार आणि कर्करोग होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका