Health Tips : काकडी खाल्ल्यावर पाणी पिण्याची चूक तुम्हीही करता का? नुकसान वाचून व्हाल सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:03 IST2022-03-12T12:03:17+5:302022-03-12T12:03:36+5:30
Health Tips : काकडी एक असं फळ आहे ज्यात ९५ टक्के पाणी असतं आणि यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि के असतं.

Health Tips : काकडी खाल्ल्यावर पाणी पिण्याची चूक तुम्हीही करता का? नुकसान वाचून व्हाल सावध!
उन्हाळा (Summer) सुरू झाला की, काकडी (cucumber) खाण्याची मजा वेगळी असते आणि सोबतच त्याचे फायदे तर अजूनही जास्त असतात. काकडी एक असं फळ आहे ज्यात ९५ टक्के पाणी असतं आणि यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि के असतं. तसेच याच्या सालीमध्येही सिलिकासारखं आवश्यक पोषक तत्व असतं. पण जर तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर ही चूक अजिबात करू नका. याने तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.
काकडी केस आणि त्वचेसाठी फार फायदेशीर असते. या फळातील पोषक तत्व शरीराला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही काकडी खाल्ल्यावर पाणी पिणं टाळलं तर. कारण काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायलात तर पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. काकडी उन्हाळ्यात फार फायदेशीर मानली जाते. हेल्दी डाएटमध्ये याचं फार महत्व आहे. कारण यात व्हिटॅमिन सी, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रेडिकल्स दूर करतात.
हाडं होतात मजबूत
काकडी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे काकडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि इम्यूनिटीही वाढते. तेच काकडीची सालही फार फायदेशीर असते. पण हेही लक्षात ठेवा की, काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण त्याने त्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.
काकडी खाल्ल्यावर पाणी पिल्याचे नुकसान
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने खाद्य पदार्थांना पचवणारं पोटातील अॅसिड योग्य प्रकारे काम करत नाही.
- जर काकडी खाऊन तुम्ही पाणी प्यायलात तुम्हाला लूज मोशन आणि डायरिया होण्याचाही धोका होऊ शकतो.
- काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने शरीराची पीएच लेव्हलही डिस्टर्ब होते.
(टिप - वरील लेखातील सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. काही समस्या असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)