Health Tips: Benefits of Walking, know when to walk and how long, Reserch | वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी आणि किती चालता? वाचा फिट राहण्याचा सोपा फंडा, रिसर्च

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी आणि किती चालता? वाचा फिट राहण्याचा सोपा फंडा, रिसर्च

चालणं किंवा फिरणं शरीरासाठी, आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी आजारांपासून दूर राहण्यासाठी चालणं नेहमी फायदेशीर ठरतं. जे लोक व्यायाम करत नाहीत, जिमला जात नाहीत. त्यांनी हेल्दी राहण्यासाठी नियमित चालायलाच हवं. अन्यथा जसजसं वय वाढत जातं तसतसे आजार उद्भवतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार जेवल्यानंतर चालल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी तसंच शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी चालण्याची एक वेळ निश्चित असणं गरजेचं आहे.

चालण्याची एक योग्य वेळ

दिवसभरात कोणत्याही वेळी चालल्यास शारीरिरक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पण वजन कमी होण्यासाठी तसंच रक्तदाब, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. ज्या  तरूणांना आता कोणताही आजार नाही त्यांनी भविष्यातील आरोग्यविषयक गोष्टी लक्षात घेता चालण्याची सवय ठेवायला हवी. 

रोज व्यायाम केल्याने वजनासह तर शरीरातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार  जेवणानंतर १० मिनिटं चालल्यानं टाईप२ डायबिटीसचा आजार असलेल्या लोकांच्या शरीरारील साखरेचं प्रमाण कमी होतं.  रोज जेवल्यानंतर १० मिनिटं चालणं फायदेशीर ठरतं. 

फायदे

दररोज चालल्यानं  हृद्यासंबंधी आजारांचा धोका टळतो. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
रोज चालायची सवय असेल तर मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे  ताणतणाव कमी होतो. मुडही फ्रेश राहतो. डिमेंशिया आणि अल्झायमर असे आजार चालण्यामुळे उद्भवत नाहीत. 

चालण्यामुळे फुफ्फुसांपर्यंत मोकळी हवा पोहोचते. परिमाणी ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो. फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं. नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. याशिवाय चालल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच, तुमच्या सृजनशीलतेला चालना मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. पचनक्रिया चांगली राहते.

दररोज किती चालायला हवं?

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दररोज कमीतकमी अर्धा तास चालायला हवं. १०००० पावलं म्हणजेच ६ ते ७ किलोमीटर चालणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. चालण्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते. प्रमाणापेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता नाही. कारण गरजेपेक्षा जास्त चालल्यानं थकवा जाणवू शकतो. संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

कोणत्या वयोगटातील व्यक्तीनं किती चालायला हवं

६ ते १७ वर्ष वयोगटातील लोकांनी १५००० पावलं चालायला हवं. १२०० पावलंही चालू शकता. १८ ते ४० वर्ष वयोगटातील लोकांनी  १२००० पावलं चालणं उत्तम ठरेल. ५० वर्ष वय असलेल्या लोकांनी १०००० पावलं चालायला हवं. ६० वर्ष वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्यांनी ८००० पावलं चालायला हवं. पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips: Benefits of Walking, know when to walk and how long, Reserch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.