शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

खुशखबर! कॅन्सरच्या उपचारांसाठी भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं अनोखं 'बँडेज', तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 6:38 PM

Latest skin Cancer Treatment News : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस (आयआयएससी), बँगलुरूच्या संशोधकांनी त्वचेच्या कॅन्सरला म्हणजे ट्यूमरला नष्ट करणारं  खास बँडेज तयार केलं आहे. 

कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा आजार उद्भवणं हे जीवघेणं ठरू शकतं.  तोंडाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर यापैकीच एक म्हणजे त्वचेचा कॅन्सर. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य रुपात वाढू लागतात तेव्हा स्किन कॅन्सर होण्याचा धोका उद्भवतो.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्याची किरणं त्वचेच्या ज्या भागांवर सतत पडतात. त्या ठिकाणी कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.  कॅन्सरवर उपचार शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस (आयआयएससी), बँगलुरूच्या संशोधकांनी त्वचेच्या कॅन्सरला म्हणजे ट्यूमरला नष्ट करणारं  खास बँडेज तयार केलं आहे. 

त्वचेचा कॅन्सर प्रामुख्याने सूर्यातून बाहेर येत असलेल्या  पॅराबॅगनी किरणांच्या जास्तवेळ संपर्कात राहिल्यामुळे  होतो.  मानेला त्रास  होणं, कपाळ, गळा, डोळ्यांची जळजळ होणं ही त्वचेच्या कॅन्सरची प्राथमिक लक्षणं आहेत. त्वचेचा कॅन्सर झाल्यास ट्यूमरच्या पेशींची वाढ व्हायला सुरूवात होते. आयआयएससी बँगलुरूच्या संशोधकांना या पेशींना नष्ट करत असलेले बँडेज तयार करण्याचा दावा केला आहे. 

तज्ज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी त्वचेच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी चुंबकिय नॅनोफायबर असणारं बॅडेज तयार केलं आहे. त्यामुळे ट्यूमरच्या पेशी नष्ट होऊ शकतात. त्वचेच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी सध्या सर्जरी, किमोथेरेपीचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त नॅचुरोपॅथी म्हणजेच नैसर्गिकरित्या उपचार करता येतात.  पण या  सगळयाच उपचार पद्धतींच्या काही मर्यादाही आहेत. आयुर्वेदाने कोरोनावर उपचार होतात? इंडियन मेडिकल असोसिएशनने सरकारकडून मागितला पुरावा

इलेक्ट्रोस्पिनिंगच्या माध्यमातून हे बँडेज विकसित केले आहे. आयआयएससीमध्ये सेंटर फॉर बायोसिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (बीएसएसई) आणि आण्विक विकास, अनुवांशिकी विभागाच्या तज्ज्ञांनी इलेक्ट्रोस्पिनिंगचा वापर करून ही बँडेजपट्टी तयार केली आहे. यात चुंबकिय नॅनो फायबरर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींना गरमी देऊन नष्ट करता येऊ शकतं. या शोध अध्ययनाने त्वचेच्या कॅन्सरच्या उपचारात एक आशेचा किरण दाखवला आहे. या संशोधनाच्या सहलेखिका शिल्पी जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार या उपचारांवर परिक्षण सुरू असून अधिक चाचणी केली जात आहे. रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याचा काय संबंध? वाचा तज्ज्ञांनी दिलेल्या BP नियंत्रणात ठेवण्याच्या टीप्स

टॅग्स :cancerकर्करोगSkin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन