शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Health: थकवा, आळस, झोप आणि घोरणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 6:36 AM

Health: झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याची कारणे आपण  बाह्य गोष्टीमध्ये (वृद्धपणा, तणाव, कामाचा व्याप) शोधतो; पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची क्वालिटी’!  आपल्या थकव्यामागे मुख्य कारण झोपच आहे हे लक्षातच येत नाही. 

- डॉ. अभिजित देशपांडे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस 

घनश्याम सरोदे (नाव बदललेले) हे ५२ वर्षांचे गृहस्थ.  मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ नोकरी,  घरी बायको, मुलगा आणि मुलगी असा चौकोनी कारभार. टापटिपीची आणि व्यवस्थितपणाची आवड. कामाला वाघ, पटपट निर्णय घेणारा माणूस अशी ऑफिसमध्ये ख्याती! पण, गेल्या पाच वर्षांमध्ये हा वेग थोडा मंदावला होता. ऑफिसमधली मिटिंग थोडी लांबली तर सरोदे साहेबांना जबरदस्त पेंग येऊ लागायची. घरातली अनेक कामे लांबणीवर पडू लागल्याने बायकोदेखील नाराज! सुट्टीच्या दिवशीदेखील सरोदे झोप काढत, त्यामुळे कुटुंब नाराज होते. सरोदे यांना व्यायामाची आवड; पण गेल्या दोन वर्षांत थकव्यामुळे इच्छाच होत नव्हती. वजनदेखील दहा पौंडांनी वाढले. या सगळ्या परिस्थितीचे कारण त्यांच्या मते अगदी स्पष्ट होते. कामाचा व्याप, वाढत्या वयामुळे  थकवा येतोय, त्यामुळे काही गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत ही बाब कुटुंबीयांनी समजून घ्यावी, असे सरोदेंना  प्रामाणिकपणे वाटे.‘झोपाळूपणा’ म्हणजे आळशी असल्याचे लक्षण अशी आपल्या भारतीयांची मनोधारणा आहे.  त्यामुळे भारतीयांना “तुमचा झोपाळूपणा वाढला आहे का?” असे विचारले तर बरेचदा उत्तर नकारार्थी येते. याउलट “तुमचा थकवा (फटीग) हल्ली वाढला आहे का?”- याचे उत्तर “होय” असे अनेक लोक देतील. थकवा आहे याचाच अर्थ मी कामसू आहे आणि आळशी नाही हे स्पष्टीकरण कोणालाही आवडेल. झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याची कारणे आपण  बाह्य गोष्टीमध्ये (वृद्धपणा, तणाव, कामाचा व्याप) शोधतो; पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची क्वालिटी’!  आपल्या थकव्यामागे मुख्य कारण झोपच आहे हे लक्षातच येत नाही. घनश्याम सरोदे यांच्या बाबतीत त्यांच्या परिस्थितीला झोपेतील बाबीच कारणीभूत होत्या. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सरोदेंना झोप अनावर झाली आणि सगळ्यांसमोर ते चक्क घोरू लागले. या प्रसंगानंतर सरोदे यांनी वैद्यकीय सल्ला घेतलाच आणि गुगलवरदेखील संशोधन केले.  काय प्रकार चालू होता  सरोदे यांच्या झोपेत? याची सविस्तर चर्चा करूयात, पुढच्या शुक्रवारी, याच ठिकाणी!iissreports@gmail.com 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य