तुम्हाला माहितीय का एक कप कॉफीचा शरीरावर काय होतो परिणाम?; जाणून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:18 IST2024-08-05T12:11:50+5:302024-08-05T12:18:55+5:30
सकाळची सुरुवात असो किंवा थकवा दूर करण्याचा मार्ग असो, एक कप कॉफी प्यायल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते.

तुम्हाला माहितीय का एक कप कॉफीचा शरीरावर काय होतो परिणाम?; जाणून व्हाल हैराण
कॉफी पिणं हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. सकाळची सुरुवात असो किंवा थकवा दूर करण्याचा मार्ग असो, एक कप कॉफी प्यायल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते.
एक कप कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसं की ऊर्जा वाढवणं, मेटाबॉलिज्म सुधारणं आणि मूड चांगला करणं. परंतु, त्याच्या अतिसेवनामुळे निद्रानाश, अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारखं नुकसान होऊ शकतं.
कॉफीमध्ये कॅफिन असतं, जे मेंदू आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करते. हे तुम्हाला अधिक सतर्क आणि जागरूक करतं. यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जा पातळी वाढते. एक कप कॉफी प्यायल्याने खूप फायदा होतो.
मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा - कॅफिन मेटाबॉलिज्म वाढवतं, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जास्त पिणं हानिकारक आहे, एक कप कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत.
मूड चांगला होतो - कॅफिनच्या सेवनाने मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढते, ज्यामुळे मूड चांगला होतो. डिप्रेशन आणि टेन्शन कमी करण्यास मदत होते.
शारीरिक हालचाली वाढतात - व्यायामापूर्वी एक कप कॉफी प्यायल्याने सहनशक्ती वाढते आणि स्नायू दुखणं कमी होतं. शारीरिक हालचाली वाढतात.
अँटिऑक्सिडंट्सचा स्रोत - कॉफीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.