टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:12 PM2024-05-01T16:12:07+5:302024-05-01T16:17:03+5:30

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि राजस्थान व्यतिरिक्त सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे. या व्हायरसबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

health delhi ncr mumps virus outbreak today cases know symptoms prevention treatment | टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक

टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक

गेल्या काही महिन्यांपासून भारतात मम्स व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांना मम्स व्हायरसची लागण झाली आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि राजस्थान व्यतिरिक्त सध्या दिल्ली-एनसीआरमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत आहे. या व्हायरसबद्दल लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण हा व्हायरस लहान मुलांना जास्त प्रभावित करतो. मात्र सर्व वयोगटातील लोक त्यांच्याकडे या व्हायरसची लागण होत असल्याने येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मम्स व्हायरस काय आहे, तो कसा ओळखावा आणि तो कसा टाळता येईल हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया...

ग्रेटर नोएडातील फोर्टिस हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन डिपार्टमेंटचे एडिशनल डायरेक्टर डॉ. दिनेश कुमार त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मम्स व्हायरसमुळे व्हायरल संसर्ग पसरतो. गेल्या काही दिवसांत मम्स व्हायरसची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. या व्हायरसच्या संसर्गामुळे लोकांच्या पॅरोटीक सॅलिव्हरी ग्लँड्सना सूज येते आणि डोकेदुखी, ताप, अंगदुखी, स्वादुपिंडात सूज येणे अशी लक्षणे दिसतात. 

मम्स व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अनेकांना भूक लागत नाही. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना या मम्स व्हायरसचा धोका जास्त असतो. मात्र व्हायरस कोणत्याही वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकतो. डॉ. त्यागी यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीचा घसा दुखत असेल, कानाजवळ सूज येत असेल, अंगदुखी असेल किंवा ताप असेल तर लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि तपासणी करून घ्यावी. 

आश्चर्यकारक बाब म्हणजे सध्या या मम्स व्हायरसची प्रकरणं वृद्ध लोकांमध्ये दिसून येत आहेत, पूर्वी लहान मुलांवर जास्त परिणाम व्हायचा. मम्स व्हायरसवर लक्षणांच्या आधारे उपचार केले जातात. कोणाला ताप असेल तर तापाचे औषध दिले जाते. इतर लक्षणं दिसल्यास त्याचे औषध दिले जाते. हा व्हायरस टाळण्यासाठी, एखाद्याने संक्रमित व्यक्तीपासून अंतर राखले पाहिजे आणि MMR लस घ्यावी. सर्व वयोगटातील लोकांना ही लस मिळू शकते आणि ती त्यांचे मम्स व्हायरसपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकते. न्यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: health delhi ncr mumps virus outbreak today cases know symptoms prevention treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.