घामाच्या दुर्गंधीने हैराण होऊ नका, घाम येणं आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 05:06 PM2021-08-30T17:06:55+5:302021-08-30T17:09:47+5:30

घामाच्या वासामुळे,बर्‍याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाचते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

health benefits of sweat, its good to sweat or sweating out | घामाच्या दुर्गंधीने हैराण होऊ नका, घाम येणं आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

घामाच्या दुर्गंधीने हैराण होऊ नका, घाम येणं आहे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर

Next

घामाला येणाऱ्या वासांमुळे शरीरातून घाम बाहेर आला नाही तर बरं होईल असं बर्‍याच जणांना वाटतं. घामाच्या दुर्घंधीमुळे लाज वाटत असली तरी घाम येणं चांगलं असतं. काहींना बाराही महिने घाम येतो. तर, काहींना अगदी कमी घाम येतो. घामाच्या वासामुळे,बर्‍याच वेळा लोकांबरोबर वावरताना लाज वाचते. पण अंगाला घाम येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरीर डिटॉक्स होतं
आवडत नसलं तरी, घाम येणं आरोग्यासाठी चांगलं आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाय होतं. घामावाटे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. घाम आल्याने शरीर थंड राहतं.

रासायनिक पदार्थ बाहेर पडतात
शरीरात अनेक प्रकारचे रसायनिक पदार्थ असतात जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. घामामुळे शरीरातून रसायनिक पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे आरोग्याच्या समस्या कमी होतात.

त्वचा चमकदार होते
घान नॅचरल क्लीनजरचं काम करतो. घाम आल्याने त्वचेवरील छिद्र उघडतात त्यामुळे शरीरातील घाण व बॅक्टेरिया बाहेर निघण्यास मदत होते. घामामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. त्यामुळे त्वचेची चमक वाढते. घाम निघून गेल्यावर त्वचा कोमल बनते.

घाम केसांसाठीही फायदेशीर
घाम फक्त त्वचाच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे. स्कॅल्पमध्ये घाम आल्याने छिद्रे उघडतात. ज्यामुळे केसांची वाढ होते. मात्र यामुळे केसात खाजही येऊ शकते त्यामुळे शॅम्पूने नियमित केस धुवावेत.

कॅलरी कॅलरी बर्न होतात
घामामुळे कॅलरी बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जास्त घाम यावा लागतो. यासाठी एक्सरसाईज किंवा कष्टाचे काम करावं लागतं.

ताण कमी होतो
घाम येण्याने तणावातून आराम मिळतो. स्ट्रेस वाढला असेल तर, व्यायाम करावा. त्यामुळे शरीरावर घाम येतो. घामामुळे शरीराची उष्णता कमी होते,ज्यामुळे तणाव कमी होण्यात मदत होते.

 

Web Title: health benefits of sweat, its good to sweat or sweating out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.