केवळ वजन उचलून फायदा नाही, फिट बॉडीसाठी एक्सरसाइजपूर्वी खाव्यात या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:32 IST2018-06-05T15:32:48+5:302018-06-05T15:32:48+5:30
जर तुम्हाला या गोष्टींचं सेवन करायचं नसेल तर वेगळ्या डाएटचा तुम्ही विचार करु शकता. खालीलप्रमाणे काही डाएट टिप्स सांगता येतील.

केवळ वजन उचलून फायदा नाही, फिट बॉडीसाठी एक्सरसाइजपूर्वी खाव्यात या गोष्टी!
चांगली आणि फिट बॉडी मिळवण्यासाठी वर्कआउट सोबतच डाएटही आवश्यक आहे. केवळ जिमला जाऊन तुमचं वजन कमी होणार नाही. आजकाल अनेकजण मसल्स बनवण्याच्या नादात वर्कआउटसोबत प्रोटीन शेक किंना पावडर घेतात. जर तुम्हाला या गोष्टींचं सेवन करायचं नसेल तर वेगळ्या डाएटचा तुम्ही विचार करु शकता. खालीलप्रमाणे काही डाएट टिप्स सांगता येतील.
एक्सरसाइज पूर्वी काय खावे?
जिम जाण्याआधी तुम्ही काहीतरी खाल्ल्यास फायदा होतो. कार्बोहायड्रेट असलेल्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता. फळे, नट्स, एक कप सूप किंवा भाज्यांचा रस तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही वेटलिफ्टिंग करणार असाल तर तुमच्यासाठी बटरसोबतच राइस केक्स चांगला पर्याय आहे. याने तुम्हाला एनर्जी मिळेल आणि तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे वर्कआउट करु शकाल. यासोबतच याने तुम्हाला कॅलरीज बर्न करण्यालाही मदत होते.
एक्सरसाइजनंतर काय खावे?
एक्सपर्ट एक्सरसाइजच्या 30 ते 60 मिनिटांनंतर काही खाण्याचा सल्ला देतात. अशावेळी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असलेल्या गोष्टी खाऊ शकता. त्यात गाजर, उकळलेली अंडी, राइस केक्स इत्यादी खाऊ शकता. त्यासोबतच तुम्ही प्रोटीन असलेलं दही, प्रोटीन पावडर घेऊ शकता.
रनिंग करणाऱ्यांनी खाव्यात या गोष्टी!
रनिंग करणाऱ्यांनी रनिंग करणाऱ्यांनी 1 तास आधी केळी, उकळलेल्या भाज्या, नट्स आणि नारळ पाण्याचं सेवन करायला हवं. रनिंग केल्यानंतर पाणी, नारळ पाणी आणि प्रोटीन-कार्बोहायड्रेट मिश्रित करुन घ्यावे.