शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल नसांमधून गायब करण्याचा खास घरगुती उपाय, एकदा करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 10:30 IST

Fenugreek Seeds For Lowering Bad Cholesterol: अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगतात असतात. जे फायदेशीरही असतात. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीचे दाणे.

Fenugreek Seeds For Lowering Bad Cholesterol: नसांमध्ये वाढत असलेलं कोलेस्ट्रॉल कोणत्याही क्षणी जीवघेणं ठरू शकतं. कारण याने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका वाढतो. अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगतात असतात. जे फायदेशीरही असतात. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीचे दाणे. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. यांनी नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं.

मेथीच्या बियांचे फायदे

- मेथीच्या पिवळ्या दाण्यांबाबत ग्रेटर नोएडाच्या GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत फेमस डयटीशियन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, मेथीचं सेवन कसं करावं आणि त्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात.

- मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि इतरही काही व्हिटॅमिन असतात. तसेच यात भरपूर फायबर, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, कॉपर आणि पोटॅशिअम असतं. 

- मेथीच्या दाण्यांमध्ये असे कंपाउंड आढळतात जे लिव्हरच्या माध्यमातून कोलेस्ट्रॉलचं एक्ट्रा प्रोडक्शन रोखण्यास मदत करतं. याने आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं एब्जॉर्ब्शन कमी होतं.

- मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारं स्टेरॉयडल सॅपोनिन हे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. या बियांमुळे नसांमध्ये गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

- अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, मेथीचे दाणे लिव्हरमध्ये असलेल्या एलडीएल रिसेप्टर्सना बूस्ट करण्यास मदत करतात. सोबतच याने लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा होते.

कसं करावं मेथीच्या दाण्यांचं सेवन?

आयुषी यादव यांच्यानुसार, फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीच्या बियांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी याचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावं. तुम्ही रात्रीच्या वेळी एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्या आणि दाणे चावून खा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य