Fatty Liver Symptoms: These 5 symptoms could be fatty liver disease warning sign | Fatty Liver Symptoms : सामान्य वाटणारी ही लक्षणं ठरू शकतात फॅटी लिव्हरचे कारण; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

Fatty Liver Symptoms : सामान्य वाटणारी ही लक्षणं ठरू शकतात फॅटी लिव्हरचे कारण; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय

फॅटी लिव्हर हा  आजार शरीरातील एक्स्ट्रा फॅट वाढल्यामुळे  होणारी एक  सामान्य स्थिती आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज  हा लिव्हरशी जोडलेल्या आजारांचा एक मुख्य प्रकार आहे. फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे माणसाच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. एक्सपर्ट्नं दिलेल्या माहितीनुसार NAFLD चे वेगवेगळे स्टेज असतात. प्रत्येक स्टेजमध्ये लक्षणं  (Fatty liver disease warning sign) वेगवेगळी असतात. 

या आजाराला कसं ओळखायचं

लॉन्ग टर्म लिव्हर डॅमेजमुळे लोकांच्या लिव्हरमध्ये सिरोसिसचा धोका वाढतो. सिरोसिस एडवांस स्टेजमध्ये पोहोचल्यास गंभीर लक्षणं दिसून येतात. नॅशनल हेल्थ सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार पाय, टाचा आणि पंज्यांवर गंभीर सुज येण्याचं हे लक्षण असू शकतं.

ही आहेत लक्षणं

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या रोगाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. त्वचेत पिवळपणा येणं, डोळ्यांचा भाग पांढरा भाग पिवळा पडणं, त्वचेवर येणारी खाज. अशी लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा. 

उपचार

डॉक्टरांच्यामते या आजाराचे काही खास उपचार नाहीत. जीवनशैलीत बदल करून  तुम्ही शरीरात होणारा बदल टाळू शकता. वाढलेलं वजन कमी करणं हा सगळ्यात उत्तम उपाय असू शकतो. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेले फॅट्स आणि फाब्रोसिसचा धोका कमी करता येऊ शकतो. 

शॉर्टकट वापरून वजन कमी करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम  होऊ शकतो. म्हणून नियमित व्यायाम आणि योग्य वर्कआऊट  करणं गरजेचं आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नल बीएमजेमध्ये प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार या आजाराचा धोका कमी करण्यासाठी औषधांचा शोध सुरू आहे. दिलासादायक! आता कोरोनापासून बचाव करणं आणखी सोपं होणार; टॅबलेटमध्ये मिळू शकते लस

जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोलचे सेवन करू नका, संतुलित आहार घ्या. आपल्या आहारात फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. साखरेचं अतिसेवन करू नका.  काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fatty Liver Symptoms: These 5 symptoms could be fatty liver disease warning sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.