(Image Credit : Fortune)
फेसबुक आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झालं आहे. त्यामुळे त्याचा आरोग्याशी देखील संबंध जोडून पाहिला जातो. अशात फेसबुक आणि यूजरच्या वागण्यासंबंधी वेगवेगळे शोधही वैज्ञानिक करत असतात. आता वैज्ञानिकांनी फेसबुकवर यूजरकडून लिहिण्यात आलेल्या पोस्टवरून डिप्रेशन आणि ड्रग अॅडिक्शनची माहिती मिळवण्यातही यश मिळवलं आहे. जसे की, एखाद्या यूजरची समस्या किती गंभीर आहे आणि तो कोणत्या समस्येशी लढत आहे. हे समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीचं जेंडर आणि वय विचारण्याचीही गरज पडत नाही.
अभ्यासकांनी २१ प्रकारच्या समस्या शोधल्या
अमेरिकेच्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी हे समजून घेण्यासाठी ९९९ लोकांचा रिसर्चमध्ये समावेश केला होता. त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर असलेल्या ९, ४९, ५३० पोस्टमधील २ कोटी शब्दांची निवड केली. या शब्दांच्या आधारावर अभ्यासकांनी २१ प्रकारच्या समस्यांची ओळख पटवली. यात प्रेग्नन्सी, पोटाशी संबंधित आजार, स्किन डिसऑर्डर, अस्वस्थता, लठ्ठपणा आणि ड्रग-अल्कोहोल अॅडिक्शन यांचा समावेश आहे.
ड्रिंक आणि बॉटलसारखे शब्द दाखवतात अल्कोहोल अॅडिक्शन
अभ्यासकांनुसार, रूग्णांच्या फेसबुक डेटाच्या मदतीने अनेक गोष्टींची बारीक-सारिक माहिती दिली जाऊ शकते. फेसबुक पोस्टमध्ये ड्रिंक, ड्रंक, बॉटलसारखे शब्द अल्कोहोल अॅडिक्शनकडे इशारा करतात. त्यासोबतच डम्ब, बुल**ट सारखे शब्द ड्रग घेण्याबाबत आणि मानसिक संतुलन बिघडण्याबाबत सांगतात.
पोस्टमध्ये स्टमक, हेड, हर्टसारख्या शब्दांचा वापर हे दाखवतं की, रूग्ण सायकॉलॉजिकल डिसऑर्डरसारख्या डिप्रेशनने ग्रस्त आहेत. गॉड, फॅमिली आणि प्रे सारख्या शब्दांचा प्रयोग करणाऱ्या रुग्णांमध्ये डायबिटीजच्या केसेस बघण्यात आल्यात.
डायबिटीज आणि मेंटल डिसऑर्डरची माहिती
हे विश्लेषण किती योग्य हे जाणून घेण्यासाठी शोधात सहभागी सर्वच लोकांची मेडिकल हिस्ट्री सुद्धा जाणून घेण्यात आली. यात अभ्यासकांनी आढळलं की, डायबिटीज आणि अस्वस्थता, डिप्रेशनसारख्या मानसिक रोगांचा अंदाज खरा ठरला. अशाप्रकारच्या रोगांची माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत चांगली आहे.
आजार सुरूवातीला रोखणं सोपं होईल
अभ्यासिका डॉ. रॅना मर्चेंट यांच्यानुसार, फेसबुक पोस्टमध्ये असलेले शब्द आजारांची संपूर्ण माहिती तर देत नाहीत, पण त्या स्थितीकडे इशारा करतात, ज्याचा ती व्यक्ती सामना करत आहे. भविष्यात अशा डेटाच्या मदतीने आजारांना सुरूवातीच्या स्टेजमध्ये रोखलं जाऊ शकतं.