प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? वेळीच सावध होण्याची आहे गरज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 17:57 IST2023-03-21T17:57:04+5:302023-03-21T17:57:11+5:30
संवेदनशील डोळ्यांवर लाइटचा प्रकाश पडताच डोकं किंवा डोळे दुखण्याची समस्या होऊ लागते. तसेच समोरच्या गोष्टी धुसर दिसू लागतात.

प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? वेळीच सावध होण्याची आहे गरज...
तुम्हाला अनेकदा अनुभव आला असेल की, जेव्हा डोळ्यांवर प्रकाश पडतो तेव्हा डोळे चमकतात आणि काही लोकांचं डोकंही दुखू लागतं. जर तुमचे डोळे लाइटबाबत संवेदनशील असतील तर लाइट तुम्हाला वेदना देऊ शकतो. संवेदनशील डोळ्यांवर लाइटचा प्रकाश पडताच डोकं किंवा डोळे दुखण्याची समस्या होऊ लागते. तसेच समोरच्या गोष्टी धुसर दिसू लागतात. या लाइट सेंसिटिविटीला मेडिकलच्या भाषेत फोटोसेंन्सिटिविटी किंवा फोटोफोबिया असं म्हटलं जातं.
ड्राय डोळे
डोळ्यात अश्रू तयार होण्याची व्यवस्था निसर्गाने यासाठीच केली आहे की, डोळ्यात सतत ओलाव्याची गरज असते. पण काही कारणांमुळे जर हा ओलावा नष्ट होत असेल आणि प्रकाश बघताच डोकं दुखत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
डोळे कोरडे झाले तर तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. या समस्येमुळे तुमचे डोळे प्रकाशाबाबत अति संवेदनशील सुद्धा होऊ शकतात. ड्राय आइज म्हणजे डोळे कोरडे झालेत काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, डोळे लाल होणे, वेदना होणे आणि अस्पष्ट दिसणे.
मायग्रेन
लाइट सेन्सीटिविटी मायग्रेनचं एक प्रमुख लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा अटॅक आला तर त्याला प्रकाशाकडे बघण्यात जास्त समस्या येऊ लागते. अशात अनेकांना डोक्यात जोरात वेदना होते. जसे क, मायग्रेनमध्ये सामान्यपणे होतं. याने बघण्याची क्षमताही प्रभावित होते.