शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : वैज्ञानिकांचा नवा दावा; सर्दीला कारणीभूत ठरणारा व्हायरस करू शकतो कोरोनापासून संरक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 20:32 IST

आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन - कोरोना महामारीच्या या काळात साधी शिंकदेखील भयभीत करत आहे. मात्र, आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे. एक्सपेरिमेंटल मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आध्ययनानुसार, सर्वसामान्य सर्दी-खोकल्यासाठी कारणीभूत ठरणारा रायनोव्हायरस इंटरफेरॉन-प्रेरित जीनची सक्रियता वाढविण्याचे कामही करतो. (Exposure to common cold virus may protect from coronavirus says US scientist)

VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी

हे जीन इम्यून सिस्टममध्ये सुरुवातीच्या मॉलीक्यूलला सक्रिय करतात. हे मॉलीक्यूल सर्दी-खोकल्यामुळे प्रभावित श्वसन मार्गात सार्स-कोव-2 च्या वाढीला आळा घालू शकतात. अध्ययनाचे प्रमुख संशोधक आणि अमेरिकेच्या येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील असिस्टन्ट प्रोफेसर अ‍ॅलेन फॉक्समॅन यांनी म्हटले आहे, की कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, अशा प्रकारे संक्रमणावर उपचार होऊ शकतो.

ते म्हणाले, ही इंटरफेरॉनने रुग्णावरील उपचाराची एक पद्धत आहे. इंटरफेरॉन इम्यून सिस्टीमचा एक प्रोटीन असतो. हा औषध स्वरुपातही उपलब्ध आहे. अ‍ॅलेन म्हणाले, 'मात्र, हे सर्व वेळेवर अवलंबून आहे.' या पूर्वीच्या अध्यनांतून हे स्पष्ट झाले होते, की इंटरफेरॉनच्या उच्च स्तराचा संबंध आजारात खराब परिणाम आल्याशी असू शकतो. हा इम्यून रिस्पॉन्स अधिक सक्रिय करू शकतो. खरे तर, इंटरफेरॉन-प्रेरित जीन कोरोना संक्रमणात संरक्षण करू शकतात, हे नव्या अध्ययनातून समजते.

कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस