जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 09:35 AM2020-03-29T09:35:40+5:302020-03-29T09:43:01+5:30

कोरोनाच्या आधी या व्हायरसने सुद्धा अशीच परिस्थीती निर्माण केली होती.

Except corona most dangerous and deadliest virus in the world myb | जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान

जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान

Next

सध्या जगभरात कोरोना व्हायरस आणि कोरोना व्हायरसपासून बचावाचे उपाय यावर चर्चा सुरू आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला  कोरोना व्हायरसप्रमाणेच महाभयंकर असलेल्या इतर व्हायरसबद्दल सांगणार आहोत. कोरोनाच्या आधी या व्हायरसने सुद्धा अशीच परिस्थीती निर्माण केली होती.


रोटा व्हायरस 

या व्हायरसला चाईल्ड किलर असं सुद्धा म्हणतात. या व्हायरसमुळे जगभरात प्रत्येकवर्षी ५ लाख लहान मुलांचा जीव जातो. या व्हायरसच्या संक्रमणामुळे ६  ते ८ वर्षाच्या मुलांना आधी डायरियाची समस्या निर्माण होते. ही समस्या वाढत जाऊन लहान मुलांचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता असते. 

स्मॉल पॉक्स

कोणत्याही व्हायरसच्या तुलनेत  हा व्हायरस सर्वाधिक लोकांचा जीव घेणारा आहे. यामुळे ३० ते ५० कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसने संक्रमित असलेला व्यक्ती एकावेळी ३ ते ६ लोकांना संक्रमित करू शकतो. 

मीजल्स

याला सामान्य भाषेत खसरा रोग असं म्हणतात. मागिल अनेक वर्षात २० कोटी लोकांचा मुत्यू या व्हायरसमुळे झाला आहे. हा व्हायरस एका वेळी १२ ते १८ लोकांना संक्रमित करू शकतो. अलिकडे या व्हायरसला वॅक्सिनच्या माध्यमातून कंट्रोल केलं जाऊ शकतं. 

डेंग्यू

डेंग्यू  हा व्हायरस डास चावल्यामुळे पसरतो. हा व्हायरस देशांमध्ये दिसून येतो. प्रत्येक वर्षी १० कोटी लोकांना इन्फेक्ट केलं जातं. ज्यामुळे २० हजार  लोकांचा मृत्यू झालेला आहे.

रेबीज

रेबीज हा आजार  कुत्रा किंवा वटवाघुळ यांच्यामुळे पसरतो.  कुत्रा चावल्यामुळे  किंवा नखं लावल्यामुळे हा आजार होतो. या आजारामुळे  ६० हजार  लोकांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिका आणि आशियात हा आजार सर्वाधिक पसरत असल्याचं दिसून येतं.

इबोला आणि मारबर्ग

या व्हायरसचा समावेश जगातील सगळ्यात जास्त धोकादायक व्हायरसमध्ये समावेश होतो. या आजारावर आत्तापर्यंत कोणतीही लसं उपलब्ध झालेली नाही. या व्हायरसचा फर्टीलिटी रेट ९० टक्के जास्त आहे. या व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर व्यक्तीला हॅमरेजिक फिवर, ऑर्गन फेलियर अशा समस्या उद्भवतात. 

एचआईवी एड्स (HIV)

तज्ञांच्यामते सध्याच्या स्थितीत  जगभरात सुमारे ४ कोटी लोक  HIV  व्हायरसने पिडीत आहेत. मागिल अनेक वर्षात २० लाखांपेक्षा जास्त लोकांचा  मृत्यू  या व्हायरसच्या संक्रमाणामुळे झाला आहे. या व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर इम्युनिटी  कमी होते. तसंच अनेक वर्षांनंतर या व्हायरसचं संक्रमण झाल्याचं निर्दशनास येतं. त्यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

Web Title: Except corona most dangerous and deadliest virus in the world myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.