टीव्ही पाहताना स्नॅक्स खाण्याची सवय असेल तर 'हे' नक्की वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:44 IST2019-04-01T16:29:31+5:302019-04-01T16:44:36+5:30
आपण टीव्ही बघताना कदम रिलॅक्स असतो. अनेकजण झोपून टीव्ही बघतात तर अनेकजण काम करता-करता. अनेकांना तर सोफ्यावर झोपून काहितरी खात टीव्ही पाहण्याची सवय असते.

टीव्ही पाहताना स्नॅक्स खाण्याची सवय असेल तर 'हे' नक्की वाचाच
(Image Credit : Catch Hindi)
आपण टीव्ही बघताना कदम रिलॅक्स असतो. अनेकजण झोपून टीव्ही बघतात तर अनेकजण काम करता-करता. अनेकांना तर सोफ्यावर झोपून काहितरी खात टिव्ही पाहण्याची सवय असते. तुम्हालाही अशीच सवय असेल तर तुमची ही सवय लगेच बदला.कारम तुमची ही सवय तुम्हाला आजारी करू शकते. खासकरून तरूणांमध्ये टिव्ही पाहताना स्नॅक्स खाण्याची सवय जास्त असते. स्नॅक्स खाल्याने हृदय रोग आणि डायबिटीजचा धोका वाढू शकतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या संशोधनानुसार, याबाबत खुलासा करण्यात आला.
संशोधकांच्या मते, जी मुलं टिव्ही पाहताना स्नॅक्सचं जास्त सेवन करतात, त्यांच्या शरीरामध्ये मेटाबोलिक सिंड्रेमचा धोका अधिक असतो. हा निष्कर्ष 12 ते 17 वर्षांच्या वयामधील 33900 तरूणांवर करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारावर काढण्यात आला आहे. संशोधनातून असं समजलं की, मेटाबोलिक सिंड्रोममुळे मुलांमध्ये ब्लड प्रेशर वाढतं, हाय ब्लड शुगर, कंबरेची चरबी आणि कोलस्ट्रॉलही वाढण्याचा धोका वाढतो.
मेटाबॉलिक सिंड्रोम
मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे फक्त एकच आजार नव्हे तर, एकत्र अनेक आजार होण्यामुळे होतो. हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविणं आणि लठ्ठपणा या सर्व गोष्टी एकत्र आल्यावर मेटाबॉलिक सिंड्रोमचं कारण बनतात. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत जे मेटाबॉलिक सिंड्रोमसाठी जबाबदार ठरतात.
बॅड कोलेस्ट्रॉल
जर तुमच्या रक्तामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात म्हणजेच, 150 मिग्रा/डेलि आहे. तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो.
हाय ब्लड प्रेशर
सर्वात जास्त मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याचा धोका हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रूग्णांना असतो. सामान्य व्यक्तीचं ब्लड प्रेशर 120/80 असं मानलं जातं. जर या सामान्य स्तरापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकता.
शुगर
जर जेवण्याआधी तुमच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण 100 पेक्षा अधिक आहे. तर तुम्हालाही सावध राहण्याची गरज आहे. कारण ही मेटाबॉलिक सिंड्रोम होण्याची लक्षणं आहेत.
लठ्ठपणा
खासकरून पोटाच्या आजूबाजूला जमा जालेली अतिरिक्त चरबी मेटाबॉलिक सिंड्रोमचं एक संभाव्य कारण असू शकतं.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.