शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 3:08 PM

संयुक्त राष्ट्रानीं जगभरात  सोमवारी  वर्ल्ड पल्सेस डे साजरा केला.

(image credit-vegan food and living)

संयुक्त राष्ट्रांनी जगभरात  सोमवारी  वर्ल्ड पल्सेस डे साजरा केला. म्हणजेच आपण  आहारात वापरत असलेल्या डाळींचा जागतीक दिवस साजरा केला. हा दिवस साजरा करण्याची सुरूवात एक वर्ष आधी पासून २०१९ मध्ये सुरूवात झाली.  हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा की लोकांना डाळींच्या आहाराचे सेवन किती फायदेशीर आहे हे सांगणे. मसुर, मुग, उडीद, कुळिद आणि तुरीची डाळं अशा वेगवेगळ्या प्रकरच्या डाळींचा समावेश आपण आहारात करत असतो. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशने डाळींच्या आहाराबाबत काही गोष्टी मांडल्या आहेत. पोषक घटकांचा साठा डाळींमध्ये असतो. मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियम असतं. डाळीत असलेल्या पोषक घटकांमुळे WHO ने डायबिटिस आणि हृदयरोगासाठी फायदेशीर मानले आहे. या आजारांमध्ये डाळी खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. डाळी  या प्रोटिन्सच्या मुख्य स्त्रोत आहेत. चला तर मग जाणून घेऊया डाळींच्या सेवनाने शरीराला कोणते फायदे मिळतात. 

डाळीत फायदेशीर तत्व आहेत. त्यात टॅन्सिन्स सुद्धा असतात.  डाळीत असलेले एन्टी ऑक्सीडंट्स शरीरासाठी फायदेशीर  असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळते.  डाळीत आढळणारे तंतुमय पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. 

डाळीत फायबर्स मोठ्या प्रमाणावर असतात. तसंच डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. परीणामी डाळींचा आहार डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर असतात. डाळ खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते. त्यासोबतच याने ब्लडमधील इन्सुलिन आणि ग्लूकोजची लेव्हलही नियंत्रणात ठेवते. 

वजन कमी करण्यासाठी तेलकट आहार न घेता जर तुम्ही डाळींचे सेवन केले तर शरीरासाठी फायदेशीर ठरेल. डाळींमध्ये आर्यन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे हृदय  निरोगी राहण्यासाठी डाळींचा आहार फायदेशीर ठरत असतो.  

शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थापासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. या डाळीचे सेवन  हाडं, दात, नखांना मजबूत करते.  डाळीत पोटॅशियम प्रमाण भरपूर असते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राखण्यास  डाळीच्या सेवनाने उपयोग होतो. ( हे पण वाचा-पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर)

आयर्नची कमतरता असेल तर उडीद डाळ आयर्नचा चांगला स्त्रोत आहे. हे खाल्याने शरीराला ताकद मिळते. मासिक पाळी असताना महिलांनी उडीद डाळ आवर्जून खावी, कारण या दिवसात आयर्नची कमतरता होते. (हे पण वाचा-पाळी थांबणार असेल तर शरीरात होतात 'हे' बदल, वाचा कोणते?)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य