शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

उन्हाळ्यात लसूण खायचा की नाही? उष्माघाताची भीती, नेमके खायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 12:59 IST

लसूण खावा की नको, किंवा किती प्रमाणात खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. कडक उन्हामुळे जीव अगदी नकोसा होतो. उष्माघाताचा फटकाही बसण्याची शक्यता असते. अशा वेळी भरपूर पाणी प्या, फळे खा, फळांचे सरबत घ्या, बाहेर पडताना महिलांनी स्कार्फ गुंडाळा, तर पुरुषांनी टोपीचा वापर करा, अशा सूचना करण्यात येतात. तसेच उष्ण पदार्थ शक्यतो टाळण्याचाच सल्ला देण्यात येतो. कुठलाही ऋतू असला तरी मसालेदार पदार्थ खाण्यासाठी जीभ तयारच असते. या मसाल्यासाठी लसूणही तितकाच गरजेचा असतो. परंतु लसूण उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात तो खायचा की नाही? असा प्रश्न अनेकांना सतावतो. मात्र, लसूण खावा की नको, किंवा किती प्रमाणात खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लसणाचे फायदे

लसूण कृमी किंवा जंतांचा नायनाट करतो. त्यामुळे लहानग्यांसाखी लसूण गुणकारी मानला जातो. हृदयरोग, पचनक्रिया सुधारण्यासाठी, खोकला आणि दमा रुग्णांनाही लसूण गुणकारी ठरतो. पाऱ्यात विषाचे प्रमाण असते. मात्र, काही पदार्थांमध्ये पाऱ्याचा वापर केला जातो. या पाऱ्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत लसणाचा वापर करण्यात येतो.

एपीएमसी मार्केटमध्ये रोज ६० ते ९० टन आवक

  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज ६० ते ९० टन लसणाची आवक होत असल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले. 
  • लसणाला मोठी मागणी असून, मोठ्या प्रमाणावर लसूण खरेदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
  • दरम्यान, सध्या किरकोळ बाजारात लसूण ८० ते १२० रूपये प्रतिकिलोने विकला जात असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

असा खा लसूण!

  • लसूण तुपात भाजून खाल्ल्यास प्रकृतीसाठी चांगलाच असल्याचे आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. 
  • आम्ल रस सोडून सर्व रस लसणात असतात. 
  • मधुर, लवण, कटू, तिखट आणि कशाय यांचा त्यात समावेश होतो. 
  • दरम्यान, विर्याचे प्रमाण वाढविण्यासाठीही लसूण गुणकारी ठरतो, असेही आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. 

पित्ताचा त्रास आहे त्यांनी लसणाचे योग्य प्रमाणात सेवन करावे. उष्ण  पदार्थांचे सेवन केल्यास पित्तदोष वाढू शकतो. मात्र, पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो. लसूण किती खावा हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. - डॉ. आशुतोष गुप्ता, समन्वयक, नॅशनल कमिशन ऑफ सिस्टम ऑफ मेडिसिन, नीती आणि नोंदणी मंडळ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नSummer Specialसमर स्पेशल