दही आणि गुळ खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अन् इतरही समस्या दूर ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 07:56 PM2021-05-07T19:56:55+5:302021-05-07T19:57:56+5:30

तुम्ही याआधी कधी दही आणि गुळ खाल्ल आहे का? नसेल तर एकदा खाऊन बघाच....रोगप्रतिकारक शक्ती तर वाढेलच शिवाय इतर आजारदेखील दूर राहतील...

Eat yogurt and jaggery; Boost the immune system and keep other problems away ... | दही आणि गुळ खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अन् इतरही समस्या दूर ठेवा...

दही आणि गुळ खा; रोगप्रतिकारक शक्ती वाढवा अन् इतरही समस्या दूर ठेवा...

Next

दही आणि गुळाचे मिश्रण तुम्ही कधीही खाल्ले नसेल पण हे अत्यंत चविष्ट लागते. केवळ चविष्ट लागणे इतपतच त्याचा उपयोग मर्यादित नाही. तर यामुळे रोगप्रतिकाराक शक्ती वाढते. कोरोनाकाळात तर याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच भरपूर इतर फायदे होऊ शकतात. कोणते फायदे? वाचा

वजन कमी होणे- दही गुळ एकत्र खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित याचे सेवन केलात तर तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी- गुळ आणि दह्यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची मात्रा वाढण्यास मदत होते. अॅनिमिया सारखे आजार दूर राहतात.

मासिक पाळीच्या दरम्यान- मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही दहि आणि गुळाचे सेवन केल्यास तुम्हाला होणारा त्रास कमी होऊ शकतो. या काळात अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. दही - गुळ खाल्ल्यामुळे हा त्रास फार मोठ्या प्रमाणात कमी होतो.

पोटाचे विकार दूर ठेवण्यासाठी - बद्धकोष्ठता, अपचन व इतर पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी दही-गुळ हा रामबाण उपाय आहे.

सर्दीपासून मुक्तता- दही आणि गुळ खाऊन तर बघा. तुम्हाला सर्दीचा त्रास फार कमी प्रमाणात होईल.

आतड्यांचे कार्य सुरळीत राहते - गुळ आणि दही एकत्र करून खाल्ल्याने आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसेच भरपूर प्रमाणात कॅल्शिअमपण मिळते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Eat yogurt and jaggery; Boost the immune system and keep other problems away ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app