शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
4
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
5
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
6
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
7
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
8
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
9
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
10
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
11
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
12
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
13
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
14
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
15
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
16
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
17
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
18
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
19
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
20
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...

‘भाज्या घ्या मुखी, आरोग्य ठेवा सुखी’; जाणून घ्या आयुर्वेदशास्त्रानुसार 'या' भाज्यांचे गुणधर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:04 IST

‘हिरवा भाजीपाला खावा रोज, राहील निरोगी आरोग्याची मौज’, ‘भाजीपाल्याचे महत्त्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्त्व...’

डॉ. अंकुश जाधवजागतिक महासाथ असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. कोरोना व त्यात आता पावसाळा. पावसाळ्यात सूर्यकिरणं प्रखर नसल्याने रोग होण्याची शक्यता अधिक असते. भूक न लागणे, सर्दी, पडसे, खोकला, ताप, आम्लपित्त, जुलाब होणे, मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार या काळात अधिक होतात. पावसाळ्यात मोजके आणि कमी खावे. पचायला हलका आहार घ्यावा. खाण्याचे पदार्थ स्वच्छ, ताजे व गरम असावेत. आहारात मिरी, सुंठ, आले, हिंग, कांदा, लसूण यासारख्या पदार्थांचा वापर अधिक करावा. फळभाज्या का खाव्यात, त्याचे उत्तर सुरुवातीच्या म्हणीत आहे. पावसाळ्यात कोणत्या फळ व पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते, ते येथे सांगितले आहे.आपण जो दररोज आहार घेत असतो, त्या आहारातूनच आपल्या शरीरास आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळत असतात. त्यातून आपली रोगप्रतिकारकशक्ती (इम्यून सिस्टीम) मजबूत होते. आजच्या विज्ञानानुसार रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी प्रथिनांची (प्रोटिन्स) आवश्यकता असते. मानवी शरीरासाठी दैनंदिन आहारातून प्रत्येक किलोमागे एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. शरीर प्रथिने साठवून ठेवत नाही. त्यामुळे ते दररोज घ्यावे लागतात. या सर्व भाज्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे कार्य करतात.

आयुर्वेदशास्त्रानुसार या भाज्यांचे गुणधर्म

  • मेथी : वात व कफ दोषनाशक आहे. भुकेची इच्छा न होणे, मधुमेह, आमवात, ताप, स्थौल्य, सूज, वारंवार जुलाब होणे यात मेथीचा उपयोग होतो. मेथी मातेचे दूध वाढविणारी आहे. मेथीचे लाडू बाळंतपणानंतर खावेत.
  • माठ : हिचे पांढरा, तांबडा व काटेरी असे तीन प्रकार असून चवीला तुरट आहे. माठ रक्तशुद्धीकर आहे. हिचा पित्तरोग रक्त व त्वचारोग, चक्कर येणे यांत चांगला उपयोग होतो.
  • वांगे : वांग्याविषयी बराच मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे वातुळ आहे. वास्तविक वांग्याने वातदोष वाढत नसून उलट दोषांचे शमन करते. पांढरे वांगे मूळव्याधनाशक आहे.
  • पालक : ही थोडी पचायला जड असली, तरी मलप्रवृत्ती साफ करणारी आहे. नेहमी खाण्यास योग्य आहे. रक्त वाढविणारी भाजी म्हणून प्रसिद्ध आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • चाकवत : ही वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन करते. ही मूळव्याध, त्वचारोग, पोटाचे विकार यासाठी चांगली असून रक्त वाढविणारी आहे. लोहाचे प्रमाण भरपूर आहे.
  • तांबडा भोपळा : शरीर बारीक असणे, लघवी साफ न होणे, सर्वांगाची आग होणे, त्वचाविकार यात उपयोगी ठरते. ज्यांना जाड व्हायचे आहे, त्यांनी दोन्ही भोपळ्यांच्या भाज्या खाव्यात.
  • कांदा : सुका खोकला, रक्तपित्त, हृदय अशक्त असणे, लघवीला अडखळत होणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, संभोगाची इच्छा कमी होणे, मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे, संधिवात, कावीळ, सूज, मूळव्याध इ. अनेक आजारांत कांद्याचा उपयोग होतो. जखमेवर याचा लेप करतात. जखम बरी होण्यास मदत होते. मुकामार लागून येणाऱ्या सुजेवर लेप करतात. फिट आली तर कांदा फोडून नाकाजवळ धरतात.
  • पडवळ : पचायला हलका, चवीला काहीसा कडू असून तिन्ही दोषकारक आहे. अजीर्ण, वारंवार तहान लागणे, पोटात जंत होणे, सूज येणे, अशक्तपणा यावर उपयोगी ठरतो. याने शौचास साफ होण्यास मदत होते.
  • तोंडली : पचायला हलकी व दोषशामक आहे. हिचा जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात. यकृतविकार, कावीळ, रक्तविकार, खोकला, दमा, मधुमेह या आजारांवर उपयोगी ठरते. परंतु, नेहमी खाऊ नये.
  • दोडका : गाठी होणे, रक्त व त्वचारोग, प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे, खोकला व दमा या आजारांवर उपयोगी.
  • मुळा : कोवळा मुळा पचायला हलका असतो. मूतखडा असलेल्यांनी कोवळा मुळा अवश्य खावा. मासिकपाळीच्या वेळी योग्य प्रमाणात स्राव न होणे, यासाठी उपयोगी आहे. भाज्या फार बारीक चिरू नयेत.
  • कारले : पचायला हलके, चवीला कडू असून तिन्ही दोषांचे शमन करणारे आहे. हे जखमांची शुद्धी करणारे व जखमा भरून येण्यास मदत करणारे आहे. याचा यकृतविकार, स्वादुपिंडाचे आजार, आमदोष, मूळव्याध, त्वचाविकार, स्थौल्य, विषबाधा इ. आजारांवर उपयोगी. योन, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणून, मधुमेही रुग्णांत विशेष उपयोगी.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या