शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
7
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
8
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
9
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
10
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
12
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
13
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
14
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
15
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
16
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
17
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
18
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
20
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Daily Top 2Weekly Top 5

या हिरव्या पालेभाज्या खा, कोरोनानंतरचा थकवा, ताण दूर करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:25 IST

हिरव्या भाज्या या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. कोरोनानंतरचा थकवा, ताण घालवण्यासाठी यांचा आहारात समावेश करा...

कोरना झाल्यानंतर अनेकजण कमजोरी, थकवा आणि मानसिक तणावाची तक्रार करतात. कोरोनानंतर शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण झालेली असते. ही कमतरता भरुन करण्यासाठी निरोगी आणि संतुलित आहार घेणे खूप आवश्यक आहे. हिरव्या भाज्या या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

पालकपालक भाजीमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि बीटा कॅरोटीनोईड सारख्या उत्कृष्ट पोषक तत्वे असतात. त्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला चांगली चालना मिळते हिरव्या पालेभाज्या, लोह, फोलेट, ल्युटिन आणि ओमेगा -3 मुबलक असल्यामुळे पालकचे सेवन केल्यास स्नायु बळकट होतात आणि ऊर्जेची कमतरता भरुन निघते. तुम्ही पालक कच्चा खाऊ शकता किंवा भाजी बनवून खाऊ शकता.

आलेआल्याचा अँटीस्पास्मोडिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल फायद्यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध, आले तणाव कमी करण्यास मदत करते आणि संसर्गजन्य रोगांना दूर ठेवते. तुम्ही एकतर कच्चे आले खाऊ शकता किंवा चहा अथवा भाजीत घालून खाऊ शकता.

ब्रोकोलीब्रोकोली पोषक तत्वांनी समृद्ध अशी भाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लूटाथिओन समृद्ध हे रोगप्रतिकारक शक्तीस मदत करते आणि शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आपण ब्रोकोलीचे सूप बनवूनही खाऊ शकता.

बेल पेपररंगीत बेल पेपरमध्ये लिंबूवर्गीय फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे ते आरोग्य उत्तम ठेवतात. कुरकुरीत बेल मिरचीमध्ये कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणून जलद रिकव्हरीसाठी हे आपल्या आहारात समाविष्ट करा.

सोयासोया प्लांट-आधारीत प्रथिने, इम्युनो-मॉड्युलेटरी आइसोफ्लेव्हन्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्ससह समृद्ध असतात. त्यामुळे आतड्याचे कार्य सुधारते. सोया आणि सोयापासून पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारून हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नvegetableभाज्या