कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 10:45 IST2019-06-29T10:37:29+5:302019-06-29T10:45:45+5:30
वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो.

कॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडा
(Image Credit : Runner's World)
वजन कमी करण्याचा विषय आला की, कॅलरी बर्न करा, कॅलरी बर्न करा, असाही एक नारा सतत ऐकायला मिळतो. पण अनेकांना कॅलरी बर्न कशा करायच्या याचा प्रश्न पडत असतो. मात्र हे तेवढच खरं आहे की, वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न गरजेचं आहे.
कॅलरी बर्न करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यासाठी खाण्या-पिण्याच्या हेल्दी सवयी लावाव्या लागतील. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करावी लागेल. घरातील काम करून, खेळून, हसून तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. कॅलरी बर्न करण्याच्या अजूनही काही गोष्टी आहेत, ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गाणी गाऊन कॅलरी करा बर्न
गाणं गाऊनही कॅलरी बर्न करता येतात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? पण हे खरंय. गाणी गाऊन तुम्ही १० ते २० कॅलरी बर्न करू शकता. पण हे यावरही अवलंबून असतं की, गाताना तुम्ही किती उंच स्वरात गात आहात.
हसून कॅलरी बर्न
जर तुम्ही केवळ १० मिनिटे दिलखुलास, मोकळेपणाने हसाल तर तुम्ही २० ते ४० कॅलरी बर्न करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच मोकळेपणाने कोणतही बंधन न ठेवता खळखळून हसा.
अॅरोबिक्स क्लास
बॉलिवूड अॅरोबिक्स क्लासमध्ये तुम्ही एकूण २०० ते ४०० कॅलरी बर्न करू शकता. तर काही दिवसांनी याच एक्सरसाइजच्या माध्यमातून तुम्ही ३०० ते ५०० कॅलरी बर्न करू शकाल. तसेच ही एक्सरसाइज केल्यावर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही एक्सरसाइजवर अवलंबून रहावं लागणार नाही.
आरामात करा ब्रश
साधारण तीन मिनिटे ब्रश करूनही तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. सोबतच तुमचे दातही अधिक स्वच्छ राहतील. त्यामुळे या दोन्हींचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर घाईगडबडीत ब्रश करू नका.
पायी चाला
सर्वात चांगली आणि सोपी एक्सरसाइज म्हणून पायी चालण्याकडे पाहिलं जातं. पायी चालूनही तुम्ही ५०० ते ६०० कॅलरी बर्न करता येऊ शकतात. तसेच पायी चालण्याने तुमचं हृदयही निरोगी राहण्यास मदत मिळते.
एकाच जागेवर बसून राहू नका
कॅलरी बर्न करणे म्हणजे काय तर शरीरातील अतिरिक्त ऊर्जा खर्ची करणे. अर्थात तुम्ही जर एकाच ठिकाणी बसून रहाल तर कॅलरी बर्न करू शकणार नाही. त्यामुळे एकाच जागेवर बसून न राहता छोटी छोटी कामे करा, पायी चाला, उभे रहा. या गोष्टींच्या मदतीने देखील तुम्ही कॅलरी बर्न करू शकता.