शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

डायबिटीस अन् वेट लॉससाठी 'ही' पान आहेत अत्यंत फायदेशीर, आजच घरी आणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:57 IST

शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये (Diabetes) रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar) करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.

शेवग्याच्या शेंगा (Drumstick) आपल्याकडे अनेकजण आमटीमध्ये वापरतात, शेवग्यामुळे आमटीची चव तर वाढतेच शिवाय शेवगा आरोग्यासाठी उपयोगी आहे. शेवग्याच्या शेंगा व्यतिरिक्त आपण त्याच्या फुले आणि पानांबद्दल बोलायचे झाल्यास त्याचाही आरोग्यासाठी खूप फायदा होतो. शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये (Diabetes) रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar) करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. शेवग्याची पाने आपल्याला कुठेही सहज सापडतील.

या पानांपासून बनवलेली पावडर तुम्ही कोणत्याही दुकानातून किंवा ऑनलाइन सहज मिळवू शकता. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या कोरड्या पावडरवर तुमचा विश्वास बसत नसेल, तर लहान हिरव्या पानांचा वापर करणे योग्य ठरेल.

शेवगा मधुमेहामध्ये वरदान -द हेल्थसाइटनुसार, शेवग्याचा वापर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी केला जातो. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शेवग्याच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर चहाऐवजी शेवग्याच्या पानांपासून बनवलेला चहा प्यायला सुरुवात करावी.

शेवग्याच्या पानांचा चहा -रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त शेवग्याची काही ताजी पाने धुऊन उन्हात वाळवायची आहेत आणि नंतर त्यांची पावडर बनवायची आहे. चहापत्तीसारखा वापर करायचा. या पावडरचा चहा रोज प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

वजन कमी होतेशेवग्याच्या चहामध्ये (Moringa Tea) डाईयूरेटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील पेशींमधील अनावश्यक पाणी कमी होते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. फायबर युक्त ड्रमस्टिक चहा शरीरातील चरबी शोषण कमी करते. इन्सुलिनचा प्रतिकार कमी करून अनावश्यक चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.

रक्तदाब कमी करण्यासाठी देखील फायदेशीर -शेवग्याच्या हिरव्या पानांच्या अर्कांमध्ये आयसोथियोसायनेट आणि नियाझिमिन असतात. हे असे संयुगे आहेत जे रक्तवाहिन्या जाड होण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळे रक्तदाबामध्येही याचा फायदा होतो.

रोगप्रतिकारक शक्ती -शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोगी असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील इंफ्लेमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स