बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन शेकचं सेवन करता? वेळीच व्हा सावध, अकाली मृत्यूचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 09:57 IST2019-05-03T09:52:29+5:302019-05-03T09:57:25+5:30
सिनेमातल्या हिरोसारखी बॉडी बनवण ही क्रेझ तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ते जिम लावण्यासोबतच इतरही अनेक गोष्टींचा आधार घेतात.

बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन शेकचं सेवन करता? वेळीच व्हा सावध, अकाली मृत्यूचा धोका!
(Image Credit : The Body Book)
सिनेमातल्या हिरोसारखी बॉडी बनवण ही क्रेझ तरूणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी ते जिम लावण्यासोबतच इतरही अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यात प्रोटीन शेकचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो. तुम्हीही फिटनेससाठी प्रोटीन शेकचा वापर करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. हा सावध राहण्याचा सल्ला एका रिसर्चमधून देण्यात आला आहे.
प्रोटीन शेकमधील BCAA चा प्रभाव
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या चार्ल्स पेरकिन्स सेंटरच्या संशोधकांनी एक रिसर्च केला आणि त्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, प्रोटीन पावडरमध्ये असलेल्या ब्रान्च चेन अमिनो अॅसिड म्हणजेच BCAAचं अधिक सेवन केल्याने शरीरावर याचा काय प्रभाव पडतो. BCAA सप्लिमेंट्स पावडरच्या रूपातही मिळतात, जे पाण्यासोबत मिश्रित करून शेक स्वरूपात सेवन केलं जातं.
काय असतो धोका?
नेचर मेटाबॉलिज्म नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, BCAA भलेही मसल्स बनवण्यात मदत करत असतील, पण याचा व्यक्तीच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच याने ना केवळ वजन वाढण्याची भीती असते तर अकाली मृत्यूचाही धोकाही अनेक पटींनी वाढतो. संशोधकांना असं आढळलं की, रक्तात जर BCAA चं प्रमाण अधिक वाढलं तर झोपेसाठी मदत करणारे हॅप्पी हार्मोन्स सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे व्यक्तीची झोप पूर्ण होऊ शकत नाही.
अमिनो अॅसिडचं बॅलन्स गरजेचं
या रिसर्चच्या सहलेखिका सॅमन्था सोलोन म्हणाल्या की, 'या रिसर्चमधून हे दाखवण्याचा प्रयत्न केली की, आपल्या शरीरात अमिनो अॅसिडचं बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी गरजेचं आहे की, वेगवेगळ्या स्त्रोतांमधून प्रोटीन मिळवावं. जेणेकरून शरीरात अमिनो अॅसिडचं बॅलन्स योग्य राहील. अशात केवळ प्रोटीन शेकवर अवलंबून राहण्यापेक्षा मांसांहार, अंडी, बीन्स, डाळी आणि नट्सचं सेवन करायला हवं. यातून तुमच्या शरीराची प्रोटीनची गरज भागवली जाऊ शकते.