शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

सुकवलेलं केळं म्हणजे 'सुपरफूड'च! एक 'सुकेळं' करतं झटक्यात 'रिचार्ज', वाचा आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:51 IST

Jara Hatke: सुकेळी हे दुर्लक्षित फळ आहे खऱ्या अर्थाने भारतीय 'सुपरफूड'! हे कुठे मिळतं, त्याचे फायदे काय, आहारात कसे सामाविष्ट करता येईल ते जाणून घेऊ. 

आपल्याला ड्राय फ्रूट्स म्हटलं की बदाम, काजू किंवा अक्रोड आठवतात, पण चवीला अप्रतिम आणि ऊर्जेने समृद्ध असलेल्या 'सुकेळी'कडे आपले दुर्लक्ष होते. सुकेळी म्हणजे केवळ सुकवलेले केळे नसून, ती आरोग्याचा एक मोठा खजिना आहे. विशेषतः वसईच्या 'राजेली' जातीच्या केळ्यांपासून तयार होणारी सुकेळी आता जगभरात ओळखली जात आहे. पण म्हणतात ना, 'पिकतं तिथे विकत नाही!' 

कोकणातील किंवा वसईच्या किनारपट्टीवर मिळणारी 'सुकेळी' (Sun-dried Bananas) हे खरं तर निसर्गाचं एक अद्भुत वरदान आहे. दुर्दैवाने, आजच्या प्रोटीन शेक च्या काळात हे पारंपारिक 'इंडियन एनर्जी बार' थोडे दुर्लक्षित झाले आहेत. त्यांचा समावेश आपल्या आहारात व्हायला हवा. 

सुकेळीचे आरोग्यदायी फायदे

१. ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत (Instant Energy):

सुकेळीमध्ये नैसर्गिक शर्करा आणि कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो किंवा झटपट ऊर्जेची गरज असते, तेव्हा सुकेळीचा एक तुकडा खाणे कोणत्याही एनर्जी ड्रिंकपेक्षा जास्त फायदेशीर ठरते.

२. पचनशक्तीसाठी उत्तम:

यात तंतुमय पदार्थ (Fiber) भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि पचनसंस्था सुधारते. ज्यांना पोटाचे विकार होतात त्यांनी आपल्या आहारात सुकेळी समाविष्ट केली पाहिजेत. 

३. लोहाची कमतरता भरून काढते:

ज्यांना ॲनिमिया किंवा रक्त कमी असण्याचा  त्रास आहे, त्यांच्यासाठी सुकेळी वरदान आहे. यात असलेल्या लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 

४. पोटॅशियमचा खजिना:

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पोटॅशियम अत्यंत आवश्यक असते, जे सुकेळीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. अर्थात त्याचे सेवन किती प्रमाणात करावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

५. हाडांच्या मजबुतीसाठी:

यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडांचे आरोग्य उत्तम राहते. वाढत्या वयातील मुलांसाठी हा एक उत्तम खाऊ आहे. एकदा का सुकेळी त्यांच्या पसंतीस उतरली तर ते बाजारातील पॅक्ड फूड खाण्यास नकार देतील. 

पक्वान्न म्हणून सुकेळीचा वापर 

सुकेळी केवळ तशीच न खाता, तुम्ही विविध गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी तिचा वापर करू शकता. हे पदार्थ 'जरा हटके' आणि आरोग्यदायी ठरतात:

सुकेळीचा शिरा: नेहमीच्या रव्याच्या शिऱ्यात सुकेळीचे छोटे तुकडे टाकल्यास शिऱ्याला एक नैसर्गिक गोडवा आणि वेगळीच चव येते. कोकणात हा प्रकार खूप लोकप्रिय आहे.

सुकेळीची खीर: तांदळाच्या किंवा शेवयांच्या खिरीमध्ये ड्राय फ्रूट्ससोबत सुकेळीचे बारीक काप टाकल्यास खिरीचा पोत (Texture) आणि चव अधिक दाणेदार आणि चविष्ट होते.

मिल्कशेक्स आणि स्मूदी: सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही स्मूदी घेत असाल, तर त्यात साखरेऐवजी सुकेळी वापरा. यामुळे स्मूदीला घट्टपणा येतो आणि साखर घालण्याची गरज उरत नाही.

सुकेळीचे लाडू: डिंकाचे किंवा मेथीचे लाडू बनवताना त्यात सुकेळीची पावडर किंवा तुकडे घातल्यास लाडू अधिक पौष्टिक होतात.

बाजारात मिळणाऱ्या कॅन्डी किंवा चॉकलेटपेक्षा 'सुकेळी' हा कधीही चांगला पर्याय आहे. हे फळ साठवून ठेवता येत असल्याने प्रवासात किंवा ऑफिसमध्ये मधल्या वेळेत खाण्यासाठी हा एक उत्तम 'हेल्दी स्नॅक' आहे. पुढच्या वेळी बाजारात गेल्यास या दुर्लक्षित पण गुणकारी सुकेळीची पाकिटे नक्की घरी आणा!

English
हिंदी सारांश
Web Title : Sun-dried bananas: A 'superfood' for instant energy and health benefits!

Web Summary : Sun-dried bananas, especially from Vasai, are a nutritional powerhouse, offering instant energy, improved digestion, and iron. Rich in potassium and calcium, they support heart health and bone strength. Use in various desserts for a healthy twist.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नVasai Virarवसई विरारkonkanकोकण