शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:56 IST

ऑनलाईन फसवणूक आणि सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन एका महिलेने आपलं जीवन संपवलं आहे.

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारीबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन फसवणूक आणि सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त होऊन एका महिलेने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना केवळ आर्थिक फसवणुकीपुरती मर्यादित नसून 'डिजिटल अरेस्ट' सारख्या फंदात पाडून गुन्हेगार लोकांना मानसिकदृष्ट्या कसं उद्ध्वस्त करतात, याचं हे उदाहरण आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर समोर आलेली 'सुसाईड नोट' मन हेलावून टाकणारी आहे.

कोतवाली शहर परिसरातील फरीदपूर भोगी गावात राहणाऱ्या २८ वर्षीय मोनिकाने २७-२८ एप्रिलच्या रात्री आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ज्यावेळी तिने हे पाऊल उचललं, तेव्हा तिची ८ वर्षांची मुलगी जिया आणि ११ वर्षांची मुलगी नंदिनी त्याच खोलीत झोपल्या होत्या. सकाळी मुलींना जाग आली तेव्हा आईला त्या अवस्थेत पाहून त्यांनी टाहो फोडला. सुरुवातीला कुटुंबाला हा प्रकार संशयास्पद वाटला, त्यांनी पोलिसांना न कळवताच अंत्यसंस्काराची तयारी केली.

स्मशानभूमीत आला तो 'धडकी भरवणारा' व्हिडीओ कॉल

प्रकरणाला वळण तेव्हा मिळालं, जेव्हा स्मशानभूमीत मोनिकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना तिच्या मोबाईलवर सतत व्हिडीओ कॉल येऊ लागले. मृत महिलेचा पुतण्या संयोग याने वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून शेवटी कॉल उचलला. समोर पोलीस वर्दीत असलेला एक व्यक्ती स्वतःला क्राईम ब्रँचचा अधिकारी सांगत होता. त्याने मोनिकाशी बोलण्याचा आग्रह धरला आणि नकार दिल्यावर कारवाईची धमकी दिली. यामुळे कुटुंबीयांना सायबर फसवणुकीचा मोठा संशय आला.

धमक्या, रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेलिंगचा सापळा

घरी परतल्यानंतर जेव्हा खोलीची झडती घेण्यात आली, तेव्हा एका डायरीमध्ये ठेवलेली चिठ्ठी सापडली. यामध्ये मोनिकाने एका अज्ञात तरुणाकडून सतत येणारे फोन, ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांचा उल्लेख केला होता. मोबाईल तपासला असता व्हॉट्सॲपवर पाच वेगवेगळ्या नंबरवरून आलेले कॉल्स, मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सापडल्या. यातील काही जण अधिकारी बनून तिला घाबरवत होते, तर काही जण गंभीर आरोप करून तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकत होते.

“पुन्हा जन्म मिळाला तर तुमचीच पत्नी होईल”

सुसाईड नोटमधील प्रत्येक शब्द काळीज चिरणारा होता. मोनिकाने लिहिलं होतं की, "सॉरी, माय डिअर हसबंड, आय लव्ह यू. तुमच्याशी खूप बोलायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मुलगा मला त्रास देतोय, ब्लॅकमेल करतोय. प्लीज माझ्या मुलांची काळजी घ्या... पुन्हा जन्म मिळाला तर तुमचीच पत्नी म्हणून जन्माला येईल. आपली एनिव्हर्सरी येत आहे, सोबत नसल्याबद्दल सॉरी. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या."

“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”

चिठ्ठीच्या शेवटी तिने आपल्या मुलीचं नाव लिहीत म्हटलं, "सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल... त्या मुलाने तुझ्या मम्माला खूप त्रास दिला आहे." या प्रकरणी पती रणधीरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुसाईड नोट आणि मोबाईल डेटाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे कोणी धमकावत असल्यास घाबरून न जाता तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीDeathमृत्यू