Video - जास्त घाम आल्यावर वजन लवकर कमी होतं?; डॉक्टरांनी सांगितलं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 14:46 IST2024-07-24T14:39:39+5:302024-07-24T14:46:23+5:30
उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया.

Video - जास्त घाम आल्यावर वजन लवकर कमी होतं?; डॉक्टरांनी सांगितलं 'सत्य'
व्यायाम करताना शरीराला जितका जास्त घाम येईल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल असं सामान्यतः लोकांचा समज असतो. कधी कधी जिम ट्रेनरदेखील असंच सांगतात. पण अनेकदा उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया.
डॉ. मनन वोहरा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडिओच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. घाम गाळून वजन कमी करण्याची कल्पना पूर्णपणे चुकीची आहे आणि या चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांनी ही बाब मनातून काढून टाकावी, असं म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या मते, घाम येणं हे शरीराचं एक कार्य आहे ज्याद्वारे शरीरातील घाण बाहेर निघून जाते आणि तापमान नियंत्रित करता येतं. जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी वर्कआउट करता तेव्हा शरीर गरम होतं आणि मग जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुम्हाला थोडासा थंडावा जाणवतो. घाम आल्यावर ज्या कॅलरीज बर्न होतात, त्या फक्त स्वेट ग्लँडच्या फंक्शनला मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी काय करावं?
1. अन्न, भाज्या आणि हेल्दी फॅट्स असलेल्या संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा.
2. तुमचे मानसिक आरोग्य आणि स्ट्रेस लेव्हलची काळजी घ्या.
3. नियमितपणे व्यायाम करा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष द्या.
4. दररोज रात्री सात ते नऊ तासांची चांगली झोप घ्या. कमी झोप तुमच्या मेटाबॉलिज्मला डिस्टर्ब करू शकते आणि अनहेल्दी फूड्सचं क्रेविंग वाढू शकतं.
वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही हे लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी लाँग टर्म सॉल्यूशनवर लक्ष द्या.