उन्हाळ्यात अंगाला खाज येतेय? तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:48 IST2018-03-31T13:48:57+5:302018-03-31T13:48:57+5:30

त्वचेला खाज येणे हा तसा दुर्लक्ष करण्याचा प्रकार अजिबात नाहीये. कारण त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो.

Does the body have itch in the summer? So then 'O' home remedies ... | उन्हाळ्यात अंगाला खाज येतेय? तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय...

उन्हाळ्यात अंगाला खाज येतेय? तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय...

उन्हाळा सुरु होताच गर्मी होणे, घाम येणे आणि त्यासोबतच अंगाला खाज येण्यासारखे प्रकार सुरु होतात. ब-याचदा हे अधिक त्रासदायक ठरतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की, अंगावर घामोळ्या येण्यास सुरुवात होते. यामुळे त्वेचेला खाज येते. चला तर मग पाहूयात काय आहेत हे उपाय…

त्वचेला खाज येणे हा तसा दुर्लक्ष करण्याचा प्रकार अजिबात नाहीये. कारण त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असतं. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि त्रस्त झाला आहात तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे या त्रासातून तुमची सुटका होईल.

त्वचेला येत असलेल्या खाजमुळे अनेकजण त्रस्त असतात यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणा-या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळून पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे. चार ते सहा तासांच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तुम्ही बर्फाचे तुकडे खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता. 

शरिराला येत असलेली खाज थांबविण्यासाठी मिठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे उपाय केल्यास त्वचेला होणारी जळजळ आणि खाज रोखण्यास मदत होते. 
उन्हापासून वाचण्यासाठी त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरू शकते. त्वचेवर कोरफड जेलसुद्धा लावता येऊ शकते.

उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.

उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी.

Web Title: Does the body have itch in the summer? So then 'O' home remedies ...