Health tips: मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे पाठदुखी कमी होते का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 05:30 PM2022-05-15T17:30:55+5:302022-05-15T17:33:03+5:30

सामान्य वाटणाऱ्या पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

does bathing with salt soap relives back pain know the truth | Health tips: मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे पाठदुखी कमी होते का? जाणून घ्या सत्य

Health tips: मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे पाठदुखी कमी होते का? जाणून घ्या सत्य

Next

सध्या धावपळीच्या युगात लोकांना अनेक शारीरिक तसंच मानसिक आजारानं ग्रासलं आहे. यामध्ये सध्या सामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे पाठदुखी. सामान्य वाटणाऱ्या पाठदुखीच्या समस्येकडे जर दुर्लक्ष झालं तर ही समस्या मोठी शकते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

नियमित योगा करा
आपल्या देशात योगासनांना विशेष महत्त्व असून आहे. योगाच्या मदतीने अनेक समस्यांवर मात करणं सोप होतं. पाठदुखीवर काही योगासनं प्रभावी ठरतात. यामध्ये त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन, पवनमुक्तासन ही आसनं नियमित करावी. यामुळे पाठदुखीचा कमी होण्यास मदत होते.

कॅल्शियमयुक्त आहार घ्या
हाडं ठिसूळ होणं हे पाठदुखीचं प्रमुख कारण मानलं जातं. यासाठी आहारात साजूक तूप, दूध, उडीद, मासे अशा पदार्थाचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनाने शरीरात कॅल्शियमची मात्रा वाढते. हाडं मजबूत होतात. त्याचप्रमाणे पाठदुखीची समस्या कमी करता येते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ करा
पाठदुखीच्या समस्येत स्नायूची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे स्नायू मोकळे करण्यासाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आराम मिळतो.

Web Title: does bathing with salt soap relives back pain know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.