शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

तुम्हाला कच्चा तांदुळ खाण्याची सवय आहे का? सामोरे जाल गंभीर परिणामांना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 5:36 PM

काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असेल तर तुम्हाला ही सवय महागाच पडू शकते.

किनारपट्टी भागात भात हे मुख्य अन्न आहे. येथील लोक चपातीच्या तुलनेत बहुतेक लोकं भात खाणं पसंत करतात. तांदुळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, फायबर, लोह, थायमिन आणि राइबोफ्लेविनचे ​​भरपूर प्रमाणात असतं. भातमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं तसंच खनिजं आढळतात. जी शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. मात्र लक्षात घ्या तांदूळ हा शिजवलेलाच असला पाहिजे. तांदुळ शिजवूनच त्याचे सेवन केले पाहिजे तरच तांदूळ फायदेशीर ठरतो. मात्र, काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असेल तर तुम्हाला ही सवय महागाच पडू शकते.

फूड पॉयझनिंग होऊ शकतेकच्च्या तांदळाचं नियमित सेवन केल्याने फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं. यामध्ये बॅसिलस सिरस नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची समस्या उद्भवू शकते.

शरीरातील उर्जा कमी होतेजे लोक कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांच्या शरीरात सतत आळस भरलेला असतो. कच्च्या तांदळाचे सेवन केल्याने थकवा येतो, ज्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते.

चयापचय क्रियेत अडथळाकच्च्या भातमध्ये लेक्टीन हे प्रोटीन आढळतं. हे खरंतर एक कीटकनाशक म्हणून काम करतं. त्यामुळे कच्च्या तांदळाचं सेवन टाळलं पाहिजे. यामुळे पचनासंबधित समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्टोनज्या व्यक्ती कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असतो त्यांनीही कच्चा तांदूळ खाऊ नये. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न