खरंच वजन कमी करायचंय? डाएटमध्ये करु नका 'या' चुका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 10:33 IST2018-11-19T10:33:21+5:302018-11-19T10:33:35+5:30
वजन कमी करण्यासाठी अनेकजण डायटिंग करण्याचा मार्ग निवडतात. यासाठी लोक प्रॉपर डाएट चार्ट बनवून डाएट करतात.

खरंच वजन कमी करायचंय? डाएटमध्ये करु नका 'या' चुका!
वजन कमी करण्यासाठी अनेकजण डायटिंग करण्याचा मार्ग निवडतात. यासाठी लोक प्रॉपर डाएट चार्ट बनवून डाएट करतात. पण यातील अनेकजण हे डाएट चार्ट तंतोतंत फॉलो करत नाहीत. तर काही लोक डाएट चार्ट तयार करतानाच वेगवेगळ्या चुका करतात. मग हे लोक विचार करत बसतात की, डाएट चार्ट फॉलो करुनही वजन का कमी होत नाही. त्यामुळे डाएट चार्ट तयार करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे बघुया.
आवडीच्या पदार्थांचा समावेश
अनेकदा काही लोक हे डाएट चार्ट किंवा प्लॅन करताना फार स्ट्रिक्ट होतात आणि डाएटमध्ये अशा काही पदार्थांचा समावेश करतात ज्यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे ते डाएट प्लॅनला लवकरच कंटाळतात. अशावेळी ते कारणं देत अनहेल्दी पदार्थ खायला लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी डाएट प्लॅन तयार करताना त्यात तुमच्या आवडीच्या पदार्थांचाही समावेश करा. पण या पदार्थांमध्ये खूप जास्त कॅलरी असतील तर असे पदार्थ आठवड्यातून एक-दोनदा किंवा कमी प्रमाणात खावे.
उपाशी राहू नका, थोडं थोडं खा
अनेकदा लोक डाएटिंगच्या नादात उपाशीच राहतात. पण केवळ एकदाच पोटभरुन जेवण केल्याने फॅट कमी होत नाही. मात्र काही तासांच्या अंतराने काही खाल्लं तर याचा तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल आणि तुम्हाला सतत भूकही लागणार नाही. याने मेटाबॉलिज्म वेगाने काम करायला लागेल. अनेकदा दिवस संपल्यावर शरीराची मेटाबॉलिज्मची प्रक्रिया हळुवार होते. त्यामुळे मुख्य जेवणासोबतच दिवसभर थोड्या थोड्या अंतराने काहीतरी खात राहणे गरजेचे आहे.
केवळ डाएटिंग नाही एक्सरसाइजही गरजेची
अनेकजण दिवसातून १०० कॅलरी कमी करुन वजन कमी करु शकतात. पण यासाठी केवळ डाएट करुन किंवा उपाशी राहून उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइजही करणे गरजेची आहे. वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमींग या एक्सरसाइज करु शकता. या सोप्या केल्यावर तुम्हाला दुसऱ्या एक्सरसाइज करण्याचीही गरज पडणार नाही.
रात्रीचं जेवण वेळेवर
रात्री झोपण्याच्या २ तासांआधी जेवण करणे चांगलं असतं. याने तुम्ही खाल्लेलं अन्न पचण्यासही मदत होईल. कोणताही जड आहार घेण्याच्या ३० मिनिटांआधी फळं खावीत. रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीरातील विषारी तत्व नष्ट होतात. आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते.