(Image Credit : flushinghospital.org)
जगभरात वेगाने कॅन्सरच्या केसेस वाढताना दिसत आहेत आणि त्यातही लंग कॅन्सर म्हणजेच फुप्फुसांचा कॅन्सर हा सर्वाज जीवघेणा आजार आहे. तसं तर फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचं मुख्य कारण स्मोकिंग हे आहे. पण सेकंड किंवा थर्ड हॅन्ड स्मोकिंग आणि वेगाने वाढत्या वायू प्रदूषणामुळेही लंग कॅन्सरच्या केसेस बघायला मिळत आहेत. अशात आम्ही तुम्हाला एका संकेताबाबत सांगणार आहोत, हा संकेत तुम्हाला तुमच्या शरीरात आढळून आला तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करावा.
काय ठरू शकतं कारण?
जर तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला असेल तर वेळीच सावध व्हा आणि याकडे दुर्लक्ष करू नका. श्वास घेण्यास त्रास होणे, भूक नष्ट होणे, सतत थकवा जाणवणे, श्वास घेताना आवाज येणे इत्यादी लंग कॅन्सरच्या कॉमन लक्षणांपैकी काही आहेत. सतत खोकला येणे हा सुद्धा लंग कॅन्सरचा संकेत असू शकतो. त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष करू नका. अशात जर तुम्हाला २ आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहत असेल त वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.
खोकला आणि कफ यावर लक्ष ठेवा
जर एखाद्या व्यक्तीला फुप्फुसाचा कॅन्सर होतो तेव्हा त्यांच्या खोकल्यातून रक्त सुद्धा येतं. त्यामुळे जेव्हाही खोकलाल तेव्हा कफवर लक्ष ठेवा. जर खोकल्यात किंवा थुंकीमध्ये काही बदल दिसत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधा. लाइफस्टाईलमध्ये आवश्यक बदल करून तुम्ही या आजारापासून बचाव करू शकता.
ई-सिगारेटही लंग कॅन्सरचं कारण
स्मोकिंग न करणाऱ्यांनी सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. कारण एक नव्या रिसर्चनुसार, ही बाब समोर आली आहे की, काही दिवसच वेपिंग म्हणजेच ई-सिगारेटचा वापर केल्याने फुप्फुसांमध्ये जळजळ सुरू होते. जे एक लंग कॅन्सरचं लक्षण आहे. रिसर्चचे मुख्य लेखक पीटर शील्ड्स यांच्यानुसार, लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, ई-सिगारेट नॉर्मल सिगारेटपेक्षा सुरक्षित असते. पण असं अजिबात नाहीये. जास्त काळासाठी ई-सिगारेटचा वापर, फ्लेवर्सचा वापर आणि निकोटीनमुळे फुप्फुसांमध्ये इन्फ्लेमेसन म्हणजे सूज आणि जळजळ होऊ लागते. याने कॅन्सरचा धोका होऊ शकतो.