पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:59 PM2021-05-18T18:59:16+5:302021-05-18T20:09:59+5:30

पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका.

Do not accidentally eat 'this' food after drinking water; The consequences can be fatal | पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

googlenewsNext

भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अनेकदा सांगितले जाते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. असे कराल तर ही चूक तुम्हाला भलतीच महागात पडेल.

आईसक्रीम
उन्हाळ्यात आईसक्रीम म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटतं. तुमच्याही तोंडाला सुटलंना. पण मित्रहो आईसक्रीम खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. यामुळे घशात खवखव होऊ शकते. आईसक्रीम खाल्ल्यानंतर १० मिनिटांनी पाणी प्यायलात तर अपाय होण्याचा टळू शकतो.

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर
काही तज्ज्ञ असेही सांगतात की जेवताना पाणी पिऊ नये. त्यामुळे जेवताना पाणी पिणे शक्यतो टाळा. त्यातही तुम्ही गरम जेवण जेवत असाल तर त्यानंतर चूकूनही पाणी पिऊ नका. यामुळे तुमच्या पचनक्रीयेत अडथळा येऊ शकतो. पचनक्रिया झाल्यानंतर ते ते गुणधर्म शरीरातील सर्व भागांपर्यंत पोहचणे जरुरीचे आहे. गरम जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास या प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरम जेवल्यानंतर साधारण ३० मिनीटांनी पाणी प्यावे.

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर
भाजलेले चणे खाल्ल्यानंतर शरीरात अजिबात पाणी जाता कामा नये. कारण भाजलेले चणे पचवण्याकरीता जठराग्नी तीव्र होण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे हा जठराग्नी शांत होतो आणि चणे नीट पचत नाहीत. त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

शेंगदाणे खाल्ल्यावर 
शेंगदाणे खाल्ल्यानंतर भरपूर तहान लागते. पाणी पिण्याची सतत इच्छ होते. पण जरा ताबा ठेवा कारण, शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळानंतर पाणी पिणे योग्य.

कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर
कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. कलिंगड व टरबुजात मोठ्याप्रमाणावर पाणी असते. त्यामुळे आपली तहान नुसतं कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानेच शांत होते. अशात तुम्ही आणखी पाणी प्यायलात तर पित्त, पोट फुगलेलं वाटणे व पोटाचे इतर विकार होऊ शकतात.

काकडी
काकडीमध्येही ९५ टक्के पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास जुलाब होण्याची शक्यता असते. काकडीमध्ये पोषणतत्वे मोठ्याप्रमाणावर असतात त्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो. परंतू ज्यावेळी तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिता तेव्हा शरीरातील जीयाईची गती वाढते आणि हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

Web Title: Do not accidentally eat 'this' food after drinking water; The consequences can be fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.