न्यूमोनियावर गुणकारी ठरतात 'हे' घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 15:00 IST2018-10-24T15:00:18+5:302018-10-24T15:00:33+5:30
जर तुम्हाला सतत ताप आणि खोकला येत असेल तर ही न्यूमोनियाची लक्षणं असू शकतात. याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळेवर योग्य ते उपचार केले नाहीत तर जीवावरही बेतू शकतं.

न्यूमोनियावर गुणकारी ठरतात 'हे' घरगुती उपाय!
जर तुम्हाला सतत ताप आणि खोकला येत असेल तर ही न्यूमोनियाची लक्षणं असू शकतात. याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळेवर योग्य ते उपचार केले नाहीत तर जीवावरही बेतू शकतं. मुलं आणि वृद्ध माणसांना या समस्यांचा अधिक सामना करावा लागत आहे. न्यूमोनिया एक मायक्रोबियल इन्फेक्शन आहे ज्याचा थेट फुफ्फुसांवरही परिणाम होतो. यामुळे फुफ्फुसांना सूज येते. हा रोग बॅक्टेरिया आणि फंगस यांसारख्या मायक्रोब्समुळे होतो. या समस्या औषधांसोबतच काही घरगुती उपायांनीही तुम्ही दूर करू शकता. यामुळे तुम्हाला कोणतेही साइड इफेक्टस होणार नाहीत...
लसूण :
ताप किंवा खोकला झाला असल्यास प्रत्येक दिवशी लसणाची एक पाकळी खाणं फायदेशीर ठरेल. न्यूमोनियाचा धोका होण्याआधीच आहारामध्ये लसणाचा समावेश करा. लसणाची पेस्ट तयार करून छातीवर त्याचा लेप लावा, असं दररोज एकदा तरी करा. लसणामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे फुफ्फुसं आणि गळ्यातील कफ स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
हळद :
न्यूमोनियावर हळदीच्या दूधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. 1 ग्लास दूधामध्ये 1 चमचा हळद मिक्स करा आणि दररोज या दूधाचे सेवन करा. हळदीमध्ये करक्युमिन नावाचं अॅन्टी-इंफ्लेमेट्री आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जे न्यूमोनियाचे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
आलं :
एक ग्लास गरम पाण्यामध्ये आलं मिक्स करा आणि गरज असल्यास त्यामध्ये मध मिक्स करा. दिवसातून 2 ते 3 वेळा याचे सेवन करणं फायदेशीर ठरेल. आल्यामध्ये अॅन्टी-इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. जे मायक्रोब्सशी लढण्यासाठी मदत करतात.
मध :
1/4 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा आणि थोडं थोडं पित रहा. मधामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-बॅक्टेरिअल, अॅन्टी-फंगल आणि अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे न्यूमोनियामुळे होणाऱ्या कफ आणि सर्दीला ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मेथीचे दाणे :
गरम पाण्यामध्ये मेथीचे दाणे उकळून घ्या आणि त्यानंतर पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही मधही मिक्स करू शकता. हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. मेथीच्या दाण्यांमध्ये थेराप्यूटिक गुमधर्म आढळतात. जे न्यूमोनियाची लक्षणं कमी करतात आणि सूजही कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.