एकदा वजन कमी केल्यानंतरही पुन्हा का वाढतं वजन? 'ही' असू शकतात कारणं....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:23 IST2019-10-15T11:17:11+5:302019-10-15T11:23:22+5:30
हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं.

एकदा वजन कमी केल्यानंतरही पुन्हा का वाढतं वजन? 'ही' असू शकतात कारणं....
(Image Credit : leaf.nutrisystem.com)
हेल्दी वेट लॉस म्हणजे कोणतीही समस्या न होता किंवा शरीरावर कोणताही वाईट परिणाम न होता वजन कमी होणं. हे एक मोठं यश मानलं जातं. वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि वेळही फार लागतो. पण वजन कमी केल्यानंतर काही दिवसांमध्येच पुन्हा वजन वाढणं सुरू होतं. अनेकांसोबत असं होतं. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर...
कार्बोहायड्रेटचं चुकीचं प्रमाण
वजन कमी करण्यादरम्यान कार्ब्स आणि प्रोटीनचं प्रमाण फार गरजेचं आहे. पण जंक फूड खाल्ल्याने किंवा ओव्हरइटिंगसारख्या चुका अनेकजण वजन कमी करण्यादरम्यान करत असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे जास्तीत जास्त लोक एक योग्य डाएट फॉलो करत नाहीत. त्यामुळे वजन कमी केल्यानंतरही अचानक वजन वाढू लागतं.
जास्त ग्रीन टी पिणे
फार जास्त प्रमाणात ग्रीन टी चं सेवन करणं सुद्धा चुकीचच आहे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर मानली जाते. पण दिवसातून केवळ दोन कप ग्रीन टी चं सेवन करणं योग्य ठरतं. जास्त ग्रीन टी किंवा कॉपी प्यायल्याने शरीरात वॉटर रिटेंशन होतं आणि याने शरीर फुगलेलं दिसू लागतं.
स्टार्चयुक्त पदार्थ खाणं
नेहमीच ऑफिसमध्ये भूक लागल्यावर लोक स्टार्ट असलेल्या पदार्थांचं सेवन करतात. बर्गर, पिझ्झा किंवा डोनट यांसारख्या पदार्थांमध्ये स्टार्चचं प्रमाण अधिक असतं. यामुळेही तुमचं वजन वाढू लागतं.
जास्त वेळ उपाशी राहणं
अनेकांचा असा समज आहे की, जास्त वेळ काहीच न खाल्ल्याने किंवा उपाशी राहिल्याने वजन कमी होतं. पण सत्य हे आहे की, जास्त वेळ उपाशी राहिल्याने आपली भूक अधिक जास्त वाढते. ज्यामुळे आपण जास्त खातो, यामाध्यमातून कॅलरीज जास्त प्रमाणात आपल्या शरीरात पोहोचतात.