Pain Killer औषधांची सवय आहे घातक, या समस्येचा होऊ शकतो सर्वात मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:50 IST2022-02-04T14:50:07+5:302022-02-04T14:50:51+5:30
Pain killer : नॉर्मल पेन किलर औषध डायक्लोफेनेकचा वापर केल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसासखा हृदयासंबंधी धोका वाढवू शकतो.

Pain Killer औषधांची सवय आहे घातक, या समस्येचा होऊ शकतो सर्वात मोठा धोका
सामान्य जीवनात नेहमीच लोक वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेन किलर (Pain Killer) चा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, पेन किलरचं सेवन करणं धोकादायक ठरू शकतं. अशाप्रकारच्या औषधांना मेडिकल भाषेत अनालजेसिक असं म्हटलं जातं. चला जाणून घेऊ याच्या नुकसानाबाबत..
नॉर्मल पेन किलर औषध डायक्लोफेनेकचा वापर केल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखा हृदयासंबंधी धोका वाढवू शकतो. एका रिसर्चमध्ये याबाबत इशारा देण्यात आला आहे. बीएमजेमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये डाइक्लोफेनेकचा वापर न करणेबाबत सूचना केली आहे.
डेन्मार्क येथील आरहुस यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, डायक्लोफेनेक सामान्य विक्रीसाठी उपलब्ध असू नये आणि जर याचा खप होत असेल तर त्याच्या पॅकेटच्या पुढच्या भागावर याच्या संभावित धोक्याबाबत माहिती दिली जावी.
डायक्लोफेनेक एक पारंपारिक नॉन-स्टेरॉयल अॅंटी-इन्फ्ळेमेटरी ड्रग म्हणजे औषध आहे. या औषधाचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात वेदना दूर करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो. या रिसर्चमध्ये डायक्लोफेनेकचा वापर सुरू करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग संबंधी धोक्याची तुलना इतर एनएसएआयडी औषधे आणि पॅरासिटामोलच्या वापर करणाऱ्यांसोबत केली आहे.