शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

५० टक्के लोकांना कल्पना सुद्धा नसते की, 'या' आजाराचे आहेत शिकार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 10:25 IST

चीननंतर सगळयात जास्त डायबिटीसचे शिकार भारतात आहेत. 

डायबिटीस हा असा आजार आहे. ज्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. अमेरिकेत डोळयांचे वाढत जात असलेले आजारसुद्धा डायबिटीसचा परिणाम आहे. काही वर्ष आधी जसजसं वय वाढत जायचं तसतसं आजारांचा सामना करावा लागायचा सध्याच्या काळात  जीवनशैलीतील बदलांमुळे सगळ्याच वयोगटातील लोकांना आजारांचा सामना करावा लागतो. खासकरून तरूण मुलं आणि लहान मुलं या आजारांचे शिकार होत आहेत.  तरूणांना कल्पना सुद्धा नसते की त्यांना अशा प्रकारचे आजार झाले आहेत. मधुमेह या आजाराने पिडीत असलेले लोक १५ ते ४९ या वयोगटात जास्त आहेत. चला चर मग याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

अनेकदा लोकांना अशा आजारांबद्दल कळायला  खुप वेळ लागतो. त्यामुळे नजर कमी होण्याची शक्यता कमी असते. शरीरातील अनेक अवयव सुद्धा डॅमेज होऊ शकतात.  तर किडनी सुद्धा खराब होऊ शकते. सर्वसाधारणपणे हा सर्वे २०१५ ते २०१६ च्या आकडेवारीवर आधारीत केले होते.  त्यात सात लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी होते.

रिसर्चकर्त्यांना असं निदर्शनास आलं की अनेकांना माहितच नसतं की त्यांना डायबिटीस आहे.  ४० टक्के लोकांनी सांगितले की ते डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषध घेत आहेत. २० टक्के पुरूष आणि २४.८ टक्के लोकांचे डाटबिटीस कंट्रोलमध्ये आहे.  अनेकांना  आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त आहे याची कल्पना सुद्धा नव्हती.  मागील वर्षी  पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी केलेल्या संशोधनात खुलासा केला आहे की ७५ टक्के लोकांची ब्लड शुगर नियंत्रणात नाही. कारण त्यांच्या आहार घेण्याच्या पद्धतीत जराही ताळमेळ दिसून येत नाही. चीननंतर सगळयात जास्त डायबिटीसचे शिकार भारतात आहेत. 

टाइप-1 डायबिटीस

हा आजार लहान असताना किंवा तरूण अवस्थेत होत असतो. इंसुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवते. यामध्ये शरीरातील बीटा सेल्स संपूर्णपणे काम करणं बंद करतात. शरीरातील ग्लुकोजचे  वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना इंसुलिनच्या इंजेक्शनची गरज भासते. त्यामुळे उर्जा निर्माण होत असते. 

टाइप-2 डायबिटीस

हा प्रकार वयाची ३० वर्ष  पूर्ण झाल्यानंतर उद्भवतो. नंतर  हळू हळू वाढत जातो. सर्वाधिक भारतीय डायबिटीसच्या याच प्रकाराने पिडित आहेत. या प्रकराचा लोकांना  लठ्ठपणाची समस्या उद्भवत असते. हे अनुवांशिक असतं. अनेकदा जीवनशैलीतील बदलांमुळे हे आजार वाढत  जातात. 

जेस्टेशनल डायबिटीस

गर्भवती महिलांना हा आजार होण्याची शक्यता असते. गरोदरपणात  रक्तात ग्लुकोजचे प्रमाण कमी असल्यामुळे अशी समस्या उद्भवते. ( हे पण वाचा-रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने बारिक होण्यासह 'या' आजारांपासून झटपट मिळेल सुटका)

डायबिटीस कमी करण्यासाठी उपाय

डायबिटीस  कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारल्याचं ज्यूस घ्या आणि ते एकत्र करून प्यावं. हे ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा. यामुळे मधुमेह कमी होते.

जेवणानंतर बडीशोप खायची सवय अनेकांना असते. ही तशी चांगली सवय आहे. डायबिटीस  असणाऱ्या व्यक्तीने रोज बडीशोप खावी. यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने जांभूळ खाल्यानं त्यांचं शुगरचं प्रमाण कमी होतं.

लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते.

डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणेआदी गोष्टी केल्या तरीही डायबिटीस नियंत्रणात राहतो. ( हे पण वाचा-Corona virus :कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यातील फरक कसा ओळखाल? जाणून घ्या)

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह