घशातून रक्त येतं म्हणून डॉक्टरकडे गेले आजोबा, एक्सरे पाहून डॉक्टरसोबत आजोबाही हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:44 PM2019-08-13T17:44:09+5:302019-08-13T17:47:53+5:30

युकेमध्ये राहणाऱ्या 72 वर्षीय आजोबांचं पोटाचं ऑपरेशन झालं होतं. पण ऑपरेशनंतर त्यांना पोटामध्ये दुखत नव्हतं तर त्यांचा घसा प्रचंड दुखत होता, एवढं की, त्यांना काही खाणंही  अवघड झालं होतं. या आजोबांना नेमकं झालयं तरी काय याचा शोध घेता-घेता अगदी डॉक्टरांच्याही नाकीनऊ आले होते. 

Dentures were stuck in a mans throat it was detected a week later | घशातून रक्त येतं म्हणून डॉक्टरकडे गेले आजोबा, एक्सरे पाहून डॉक्टरसोबत आजोबाही हैराण!

घशातून रक्त येतं म्हणून डॉक्टरकडे गेले आजोबा, एक्सरे पाहून डॉक्टरसोबत आजोबाही हैराण!

googlenewsNext

आपण अनेकदा अशा बातम्या पाहतो की, ऑपरेशन दरम्यान पोटाच कापसाचा बोळा राहिला किंवा मग ऑपरेशन करताना वापरण्यात येणारं एखादं हत्यारचं राहिलं. डॉक्टरांच्या हलगरजीपणामुळे या गोष्टी घडत असल्याच्या बातम्या आपल्या कानावर अनेकदा येत असतात. असाच पण थोडा वेगळा प्रकार युकेमध्ये घडला आहे. येथे राहणाऱ्या 72 वर्षीय आजोबांचं पोटाचं ऑपरेशन झालं होतं. पण ऑपरेशनंतर त्यांना पोटामध्ये दुखत नव्हतं तर त्यांचा घसा प्रचंड दुखत होता, एवढं की, त्यांना काही खाणंही  अवघड झालं होतं. या आजोबांना नेमकं झालयं तरी काय याचा शोध घेता-घेता अगदी डॉक्टरांच्याही नाकीनऊ आले होते. 

आता तुम्हीही विचारात पडला असाल ना? ऑपरेशन झालं पोटाचं पण घसा दुखत होता, आणि डॉक्टरांच्याही लक्षात येत नव्हतं... मग या आजोबांना नक्की काय झालं होतं? त्याचं झालं असं की, युकेमध्ये राहणाऱ्या एका 72 वर्षांच्या आजोबांवर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पण शस्त्रक्रियेच्या सहा दिवसांनी आजोबा पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, त्यांच्या घशातून रक्त येत असून घसाही प्रचंड दुखत होता. फक्त खोकलं तरिही रक्त येत होतं. एवढचं नाहीतर त्यांना काही खाणंही अशक्य झालं होतं. 

डॉक्टरांना वाटलं की, शस्त्रक्रियेदरम्यान, घशातून नळी घालानी लागल्याने कदाचित इन्फेक्शन झालं असावं. डॉक्टरांनी छातीचा एक्स-रे काढला. पण काहीही गंभीर आढळलं नाही म्हणून त्यांनी औषधं देऊन घरी पाठवलं. पण आजोबा दोन दिवसांनी पुन्हा डॉक्टरांकडे आले. त्यांचा घसा पूर्वीपेक्षा अधिक दुखत होता. खोकल्यातून पूर्वीसारखंचं रक्त येत होतं. त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की घशाच्या त्रासाने त्यांना औषधंही घेता आली नाहीत. तसेच त्यांना झोपल्यावर श्वास घेता येत नव्हता.

डॉक्टरही ऐकून विचारात पडले. यावेळी डॉक्टरांना वाटलं होतं की, कदाचित इन्फेक्शन झालं असाव. तेव्हा डॉक्टरांनी घशाचीही तपासणी केली. त्यावेळी त्यांना आढळलं की, आजोबांच्या घशात काहीतरी अर्धवर्तुळाकार आकाराचा धातू अडकला आहे. आजोबांना त्याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांची दाताची कवळी ऑपरेशनच्या दिवसापासून हरवली आहे. डॉक्टरांनी हे ऐकल्यावर चटकन घशाचा एक्स-रे काढला. त्यावेळी जे समोर आलं ते पाहून डॉक्टरही अवाक् झाले होते. आजोबांची हरवलेली कवळी त्यांच्या घशात अडकली होती. 

खरं तर शस्त्रक्रियेदरम्यान जेव्हा आजोबांना अनेस्थेशिया देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भूलीमद्ये कवळी गिळली आणि ती त्यांच्या घशात अडकली. आजोबांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आजोबांना 6 दिवसांनी घरी सोडण्यात आलं. 

डॉक्टरांना वाटलं की, आता आजोबांची चिंता मिटली. पण पुन्हा काही दिवसांनी ते हॉस्पिटमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या तोडांतून रक्त येत होतं. तपासणीनंतर डॉक्टरांना समजलं की, ज्या ठिकाणी घशात कवळी अडकली होती तिथली रक्तवाहिनी फाटली आहे. यानंतर त्याच्यावर दुसरी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ६ दिवसानंतर त्याच्यात सुधारणा दिसू लागल्या. यावेळी मात्र आजोबांचा त्रास संपला होता.  

Web Title: Dentures were stuck in a mans throat it was detected a week later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.