'या' समस्या असेल तर उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका दही, फायद्यांऐवजी होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 10:13 IST2024-03-16T10:12:30+5:302024-03-16T10:13:26+5:30

Dahi Side Effects In Summer :उन्हाळ्यात काही लोकांनी दह्याचं सेवन सांभाळून केलं पाहिजे. असं केलं नाही तर फायद्यांऐवजी याने नुकसान होऊ शकतं.

Curd Side Effects in Summer : Who should not eat curd in summer | 'या' समस्या असेल तर उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका दही, फायद्यांऐवजी होईल नुकसान

'या' समस्या असेल तर उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका दही, फायद्यांऐवजी होईल नुकसान

Dahi Side Effects In Summer : उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक पोट थंड थेटवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करत असतात. असाच एक पदार्थ म्हणजे दही. उन्हाळ्यात दह्याचं सेवन करणं फार फायदेशीर असतं. यात आढळणारं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, शुगर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B सारखे पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण असं असलं तरी उन्हाळ्यात काही लोकांनी दह्याचं सेवन सांभाळून केलं पाहिजे. असं केलं नाही तर फायद्यांऐवजी याने नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊ उन्हाळ्यात कुणी करू नये दह्याचं सेवन...

'या' 5 लोकांनी टाळावं दह्याचं सेवन

1) पोट फुगण्याची समस्या

दह्यातील प्रोबायोटिक्स पोटातील उष्णता कमी करतं. पण अनेकदा याने गॅस आणि ब्लोटिंगही होऊ शकतं. दही पचनास जड असतं. त्यामुळे अशा लोकांनी दह्याचं सेवन टाळलं पाहिजे, ज्यांना गॅस आणि ब्लोटिंगची समस्या आहे.

2) बद्धकोष्ठता

ज्या लोकांचं पचन तंत्र कमजोर आहे त्यांनी रोज दही खाणं टाळलं पाहिजे. पचन तंत्र ठीकपणे काम न करण्याच्या स्थितीत दही खाल्लं तर बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. 

3) यूरिक अॅसिड

यूरिक अॅसिडची समस्या असलेल्या लोकांनीही दह्याचं जास्त सेवन करणं टाळलं पाहिजे. दह्यात प्रोटीन असतं आणि यूरिक अॅसिडची समस्या असलेल्या लोकांना प्रोटीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. दही खाल्ल्याने शरीरात यूरिक अॅसिड वाढतं. ज्यामुळे जॉइंट्समध्ये वेदना आणि सूज येण्याची समस्या होऊ शकते.

4) अस्थमा

अस्थमाच्या रूग्णांनी चुकूनही दह्याचं सेवन करू नये. दही थंड असतं. जेव्हा अस्थमाचे रूग्ण याचं सेवन करतात तेव्हा त्यांना सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होऊ शकतात. यामुळे समस्या वाढते.

5) आर्थरायटिस

अर्थरायटिसची समस्या असलेल्या लोकांनी दही खाणं टाळलं पाहिजे. दह्यात सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं. अॅडव्हांस ग्लायकेशनही भरपूर प्रमाणात असतं. यामुळे हाडांचं घनत्व कमी होऊ शकतं. आर्थरायटिसचे रूग्ण जेव्हा याचं सेवन करतात तेव्हा त्यांच्या गुडघ्यांमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते.

Web Title: Curd Side Effects in Summer : Who should not eat curd in summer