(Image Credit : qimrberghofer.edu.au)
सध्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. त्यातील एक म्हणजे क्रोहन रोग. ही एक पचन तंत्रावर सूज येण्याची समस्या आहे. यात पचन तंत्राच्या कोणत्याही भागावर सूज येऊ शकते. पण जास्तकरून यात छोट्या किंवा मोठ्या आतड्या अधिक प्रभावित होतात.
क्रोहन रोग हा पुरूष आणि महिला कुणालाही होऊ शकतो. तसेच कोणत्याही वयात होऊ शकतो. हा आजार साधारणपणे १५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये अधिक बघायला मिळतो. मात्र, या आजाराच्या कारणांना नियंत्रित केलं तर हा आजार दूर केला जाऊ शकतो.
या आजाराची लक्षणे
या आजाराची फारच सामान्य लक्षणे आहेत. त्यात लूज मोशन, पोटात वेदना, वजन कमी होणे आणि त्वचेवर चट्टे किंवा लाल डाग पडणे ही आहेत. जर तुम्ही पोटात दुखत असेल विष्ठेतू रक्त येत असेल, वेगाने वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काय असतात कारणे?
इम्यून सिस्टीम-व्हायरस किंवा बॅक्टेरिया क्रोहन रोगाचं कारण ठरू शकतात. हा आजार त्या लोकांमध्ये अधिक बघितला जातो ज्यांच्या घरात हा आजार एखाद्या व्यक्तीला आधीच झाला असेल. हा आजार होण्याला धुम्रपान हे एक मुख्य कारण आहे. तसेच इबुप्रोफेन, नेप्रोक्सेन सोडिअम, डायक्लोफेनाक सोडिअम नॉन स्टेरॉयडल अॅंटी इंफ्लेमेटरी ड्रग क्रोहन रोगासाठी जबाबदार असतात. त्यासोबतच रिफाइंड आणि चरबीयुक्त पदार्थ अधिक सेवन केल्यानेही हा आजार होतो.
कसे करतात उपचार?
या आजाराला दूर करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. सर्जरी करूनही यावर उपचार करतात. त्यासाठी ९० मिनिटांचा वेळ लागतो. यात जो भाग प्रभावित झाला आहे तो कापून काढला जातो. तसेच यावर उपचार करण्यासाठी एख आर्टिफिशिअल टेक्निकही शोधून काढली आहे.
कशी घ्याल काळजी?
- चरबी आणि फायबरचं जास्त प्रमाण असलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. मसालेदार पदार्थ, मद्यसेवन आणि कॅफीन या आजाराचा धोका अधिक वाढवतात पाणी भरपूर प्यावे.
- मल्टी व्हिटॅमिन्स घ्या कारण क्रोहन रोग तुमच्या शरीरातील पोषक तत्वांचा प्रभाव कमी करू शकतो. कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्यावा.
- धुम्रपान बंद करा. कारण याने हा आजार होण्याचा धोका अधिक वाढतो. तसेच तणाव नियंत्रित करा. तणाव नियंत्रित करण्याला समस्या येत असेल तर एक्सरसाइज करा.