Covid-19 these fruits and tea can stop the corona virus says study | आहारात 'या' ज्यूसचा समावेश असल्यास कोरोनापासून होईल बचाव; संशोधनातून माहिती समोर

आहारात 'या' ज्यूसचा समावेश असल्यास कोरोनापासून होईल बचाव; संशोधनातून माहिती समोर

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत आहे. कोरोनाला लांब ठेवण्यासाठी सर्वच लोक रोगप्रतिकारकशक्ती वाढवत आहेत. त्यासाठी चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करत आहेत. कोरोनाचा प्रसार  रोखण्याबाबत एक नवीन संशोधन समोर आलं आहे. व्हायरसचं संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी, क्रॅनबेरी आणि डाळिंबचा रस अशा पदार्थाचे सेवन करण्याचा सल्ला या अभ्यासातून देण्यात आला आहे. या पदार्थांचे सेवन केल्याने जीवघेण्या आजारांचा धोका कमी होतो. 

इंस्टिट्यूट ऑफ मॉलक्यूलर वायरोलॉजी, यूएलएम यूनिवर्सिटी मेडिकल सेंटर आणि इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (जर्मनी) द्वारे करण्यात आलेल्या एका प्रयोगाचे  चांगले परिणाम दिसून आले होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन वस्तूंच्या सेवनाने इंफेक्शन रोखण्यास मदत होते. या अभ्यासासाठी वैज्ञानिकांनी हर्बल पदार्थांना इन्फ्लूएंजा ए वायरस, एडिनो वायरस टाइप-5 आणि SARS-CoV-2 ला एकाच खोलीत समान तापमानात ठेवलं होतं.  त्यानंतर व्हायरसच्या संक्रामकतेचा अंदाज घेण्यात आला. या प्रयोगाचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. 

फ्लू पर भी हुई टेस्टिंग

रिपोर्ट्सनुसार चोकबॅरीचा रस व्हायरसची इंफएक्टिव्हिटी ३००० पटीने कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. डाळिंबाचा रस आणि ग्रीन टी च्या सेवनाने व्हायरसची इंफक्टीव्हिटी म्हणजेच संक्रमणाची क्षमता १० टक्क्यांनी कमी होते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लू च्या व्हायरसवरचे परिणाम पाहण्यासाठी हे संशोधन  करण्यात आले होते. या अभ्यासात दिसून आलं की ५ मिनिटात व्हायरसच्या संक्रमणाची क्षमता ९९ टक्क्यांनी कमी होते. 

दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

क्रॅनबेरीचा रस कोरोना व्हायरसची इंफेक्टीव्हिटी ५ मिनिटात ९७ टक्क्यांनी कमी करतो. तसंच डाळिंबाचा रस आणि ग्रीन टी मुळे व्हायरसची इन्फेक्टीव्हिटी ८० टक्क्यांनी कमी होते. एल्डरबॅरीच्या रसाने कोरोना व्हायरसच्या प्रभावावर कोणताही खास परिणाम दिसून आला नाही.  संशोधकांनी कोरोना व्हायरसला लांब ठेवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त रिस्क असलेल्या रुग्णांनी याचा वापर करायला हवा. हर्बल चहाचेही अनेक फायदे आहेत. आपातकालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर सुरू होणार? कोरोनाच्या वाढत्या प्रसारानं वाढली चिंता

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid-19 these fruits and tea can stop the corona virus says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.