हवेतून कोरोनाचं संक्रमण पसरतं; तज्ज्ञांच्या 'या' दाव्याबाबत WHO ने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 17:02 IST2020-07-07T16:53:51+5:302020-07-07T17:02:09+5:30
CoronaVirus News Updates: कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हवेतून कोरोनाचं संक्रमण पसरतं; तज्ज्ञांच्या 'या' दाव्याबाबत WHO ने दिलं स्पष्टीकरण
कोरोनाचा प्रसार वाढत असताना जगभरातील तज्ज्ञांनी विषाणूंबाबत जागितक आरोग्य संघटनेला पत्राद्वारे माहिती दिली आहे. ३२ देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसचे अस्तित्व हवेतही असते. तज्ज्ञांना या पत्रातील माहिती भविष्यकाळातील जर्नलमध्ये प्रकाशित करायच्या आहेत. परंतू त्याआधीच या माहितीचा प्रसार सर्वत्र वेगाने झाला आहे. संशोधकांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला गाईडलाईन्स देण्याची मागणी केली आहे.
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार हेल्थ एजन्सीने म्हटले आहे की, हा विषाणू हवेत जिवंत राहू शकतो याचे पुरावे दिले आहेत, पण हा हवेतून पसरणारा विषाणू आहे अशा निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार WHO ला दिलेल्या पत्रात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हवेत असलेल्या सामान्य व्हायरसच्या कणांमुळेही लोकांमध्ये संक्रमण पसरत आहे. तसंच कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
काय म्हणाली जागतिक आरोग्य संघटना
जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, कोरोना व्हायरस हा सार्स कोविड19 चा आजार माणसांमध्ये पसरण्याचं कारण ठरला आहे. मुख्य स्वरुपातून संक्रमित व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोनाचं संक्रमण पसरतं. पण जगभरातील तज्ज्ञांनी WHO ला पत्राद्वारे कोरोना हा हवेमार्फत संक्रमण पसरू शकतो. असा संदेश दिला होता.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ता तारिक जसारेविक यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हवेतून पसरतो की नाही. यावर पळताळणी आणि परिक्षण सुरू आहे. पण कोरोना हवेतून कसा पसरतो याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पण कोरोनाचा प्रसार खरंच हवेमार्फत होत असेल तर WHO कडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर लोकांमध्ये ३.३ फुटांचे अंतर असायला हवे. तरंच संक्रमणाचा धोका टळू शकतो.
दिलासादायक! भारतात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त औषध; जाणून घ्या किंमत
कोरोनाशी लढण्यासाठी नैसर्गिकरित्या 'हर्ड इम्युनिटी' विकसित होणं अशक्य; तज्ज्ञांचा दावा