Coronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:22 IST2020-03-31T15:18:30+5:302020-03-31T15:22:49+5:30
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस हार्ड सरफेसवर तासंतास सक्रिय राहू शकतो.

Coronavirus : 'या' वस्तूवर जास्त वेळ राहू शकत नाही कोरोना व्हायरस, या दिवसात याचाच वापर ठरेल फायदेशीर!
कोरोना व्हायरसमुळे जगभरात लोक हैराण झाले आहेत. आतापर्यंत जगभरातील साडे सात लाख लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस हार्ड सरफेसवर तासंतास सक्रिय राहू शकतो. केवळ एक अशी वस्तू ज्यावर हा व्हायरस जास्त वेळ टिकू शकत नाही, असा दावा केला जात आहे.
द सनमधील एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरस प्लास्टिक किंवा स्टीलच्या सरफेसवर तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ टिकतो. तर कागदावर कोरोना व्हायरस 24 तासांपर्यंत जिवंत राहू शकतो.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस तांब्याच्या वस्तूंवर सर्वात कमी वेळासाठी सक्रिय राहू शकतो. तांब्याच्या वस्तूंवरील व्हायरस निष्क्रिय होण्यासाठी केवळ 3 ते 4 तासांचा वेळ लागतो.
साधारण 46 मिनिटांच्या आत तांब्यावर याचा प्रभाव अर्ध्यापेक्षा कमी होतो. अशात तांब्यापासून तयार वस्तूंचा वापर करणं तुमच्यासाठी सुरक्षित राहू शकतं.
1) कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन दरम्यान तांब्याची भांडी वापरणे फायद्याचं राहील. जर ही भांडी कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले तरी कमी वेळातच ते निष्क्रिय होतात.
2) घर किंवा टॉयलेटच्या दरवाज्यावरील हॅन्डल हे सध्या सर्वात घातक ठरू शकतं. टॉयलेट आणि मेन गेटवरील हॅंडल्सचा काळजीपूर्वक वापर करा.
3) वर्क फ्रॉम होन करताना तुम्ही आजूबाजूला ऑफिसप्रमाणे पाण्याची बॉटल ठेवू शकता. ही बॉटल प्लास्टिकची किंवा स्टीलची नाही तर तांब्याची वापरा.