युद्ध जिंकणार! शरीरातील कोरोना प्रसाराला रोखणार 'वॅकिओलिन' आणि 'एपिलिमोड' ही दोन औषधं, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:17 PM2020-08-19T14:17:45+5:302020-08-19T14:27:48+5:30

वॅकिओलिन (vacuolin), आणि एपिलिमोड( apilimod) ही औषध कोविड १९ पसरवत असलेल्या कोरोना व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात.

Coronavirus vaccine two existing drugs vacuolin 1 and apilimod prevent covid 19 in human cells | युद्ध जिंकणार! शरीरातील कोरोना प्रसाराला रोखणार 'वॅकिओलिन' आणि 'एपिलिमोड' ही दोन औषधं, तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! शरीरातील कोरोना प्रसाराला रोखणार 'वॅकिओलिन' आणि 'एपिलिमोड' ही दोन औषधं, तज्ज्ञांचा दावा

Next

 कोरोना माहामारीचा प्रसार वेगानं वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्याही जगभरात वाढत आहे. चीनमधून पसरलेल्या या माहामारीनं रुग्णसंख्येत आतापर्यंत २ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी आतापर्यंत कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही.  गंभीर आजारात असलेल्या औषधांचा वापर करून कोरोना रुग्णाचा जीव वाचवला जात होता. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. 

वॅकिओलिन (vacuolin), आणि एपिलिमोड( apilimod) ही औषध कोविड १९ पसरवत असलेल्या कोरोना व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात. शरीरात प्रवेश केल्यानंतरही व्हायरसचा विस्तार  होण्यापासून रोखण्यासाठी ही औषधं परिणामकारक ठरतात. हा अभ्यास जर्नल पीएनएएसमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. एका वर्षांपूर्वी या दोन औषधांना विकसित करण्यात आलं होतं. 

आऊटलुक इंडीयाच्या रिपोर्टनुसार या औषधाने कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत असलेल्या एजाइम्सवर (पिकफाईव्ह कायनेज) नियंत्रण मिळवता येतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक आणि वरिष्ठ साहाय्यक लेखक थॉमस किरछाऊसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासातून दिसून आले की कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरत आहे. 

प्रयोगशाळेत चाचणीदरम्यान एपिलिमोड हे औषध व्हायरससाठी मारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. एपिलिमोड हे औषध इबोला व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपयोगात आलं होतं.  कोरोनाचा सामना करण्यासाठी ही दोन प्रभावी  औषधं सापडल्याचं किरछाऊसेन म्हणाले. व्हायरसचं रेपल्पिकेशन म्हणजेच संख्या वाढण्यापासून रोखण्यासाठी हे औषध फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे तज्ज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 

 कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार निर्माण केला असताना एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. देशांच्या प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीमध्ये कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडी विकसित झाल्या आहेत. एका नॅशनल लेव्हल प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये कोविड १९ टेस्टच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

शहरातील अनेक सिविल कॉर्पोरेशंस आणि देशांतील काही प्रमुख रिसर्च संस्थानांच्या (TIFR, IISER) सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील काही भागांमधील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी समोर आली. एक चतुर्थांश व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या एंटीबॉडी तयाशरीरात एंटीबॉडीज तयार होणं म्हणजेच कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे.

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्‍य डॉ शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत हा एकमेव असा देश आहे. ज्या देशात जास्त सीरो पॉझिटिव्हीटी दिसून आली आहे. यातून रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्याचं दिसून येत आहे.र झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरातही सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतही नुकतंच सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २३ टक्के व्यक्ती सीरो-पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. दिल्लीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे.

हे पण वाचा- 

खुशखबर! भारतात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार

कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

Web Title: Coronavirus vaccine two existing drugs vacuolin 1 and apilimod prevent covid 19 in human cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.