....म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 07:56 PM2021-01-21T19:56:45+5:302021-01-21T20:10:10+5:30

CoronaVirus News & Latest Updates : "दिवसरात्र मेहनतीने तयार केलेल्या लसींच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही."

Coronavirus vaccination in india covid-19 vaccine corona vaccine side effects | ....म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती 

....म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती 

googlenewsNext

(image credit- PTI)

भारतातील कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा आज सहावा दिवस आहे. यावेळी देशभरात आतापर्यंत आठ लाख सहा हजार लोकांना लसी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या 24 तासात एक लाख 31 हजार 649 लोकांना लसचा पहिला डोस देण्यात आला आहे. जरी काही ठिकाणी लसीचे काही दुष्परिणाम देखील पाहिले गेले आहेत, जे अत्यंत सामान्य आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गुरुवारी लोकांचा होणारा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, ''लसीकरण हे कोविड -19 च्या लढाईत शेवटचा योग्य पर्याय ठरणार आहे. हे दुर्दैव आहे की काही लोक राजकीय कारणांमुळे लसीबद्दल चुकीची माहिती पसरवित आहेत. यामुळे लोकांच्या एका छोट्या गटाला या लसीबाबत संकोच वाटतो.''

कोवैक्सीन

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, ''अशी लस घेण्यासाठी लोकांनी मागे पुढे पाहू नये,  कारण त्यांना एखाद्या मार्गाने नुकसान होण्यापासून वाचवता यावं,अशी सरकारची इच्छा आहे. डॉक्टरांप्रमाणेच प्रत्येकालाही समान संरक्षण असले पाहिजे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.  सौम्य दुष्परिणाम सामान्य आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या लसीकरणानंतर दिसू शकतात. ''

कोरोनाची लस घेतल्यानंतर दिसणारे साईट इफेक्टस

सौम्य वेदना

चक्कर  येणं

घाम गाळणं

जड वाटणं

लाल चट्टे  येणं

स्वदेशी लस कोवॅक्सिन कितपत सुरक्षित? 

गेल्या काही दिवसांपासून स्वदेशी लस कोवॅक्सिनची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महामारी विज्ञान आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक आणि वैज्ञानिक डॉ. समीरन पांडा म्हणतात, "दिवसरात्र मेहनतीने तयार केलेल्या लसींच्या कार्यक्षमतेवर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही." कोवाक्सिन लसीकरणाचे काम  वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच सुरू करण्यात आले. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

देशातील अनेक तज्ज्ञांनी घेतली लस

दिल्लीच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ एन. माथूर यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. ते म्हणतात,''कोरोना लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी मी लसीचा पहिला डोस घेतला आणि मला कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मी ताबडतोब काम करण्यास सुरवात केली. '' याशिवाय सफदरजंग रुग्णालयाचे आरोग्य अधिक्षक डॉ. आर्य यांनीही ही लस घेतली आहे. ते म्हणाले, ''आज मला लस मिळाली आहे आणि मला लसीबाबत काहीच तक्रार नाही. मला बरं वाटतंय.'' चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा

Web Title: Coronavirus vaccination in india covid-19 vaccine corona vaccine side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.