शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Corona Vaccine : 2 ते 6 वयोगटातील मुलांच्या लसीची चाचणी सुरू, पुढील आठवड्यापासून दिला जाणार दुसरा डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 9:17 PM

Corona Vaccine : चाचणीत भाग घेतलेल्या 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे.

ठळक मुद्देइंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, चाचणीत सामील असलेल्या 6 ते 12 वयोगटातील मुलांना पुढील आठवड्यात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो.याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत ही लस मुलांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तविली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता मुलांसाठी लस (Vaccine for Children) तयार करण्यात येत आहे. या मुलांच्या कोरोना लसीची सध्या चाचणी सुरु आहे. 

या लसीच्या चाचणीबद्दल एक चांगली बातमी आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, चाचणीत सामील असलेल्या 6 ते 12 वयोगटातील मुलांना पुढील आठवड्यात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो. भारत बायोटेकच्या या लसीची चाचणी एम्समध्ये सुरू आहे. दरम्यान, चाचणीत भाग घेतलेल्या 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरीकडे, पुढच्या आठवड्यात चाचणीत सामील झालेल्या 2 ते 6 वयोगटातील मुलांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. 

याआधी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सप्टेंबरपर्यंत ही लस मुलांसाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तविली होती. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतर 12 मे रोजी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर गांभीर्य व परिस्थितीचा विचार करून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) चाचणीला मंजरी दिली होती.

झायडस कॅडिलाने सुद्धा तयार केली लसया आठवड्याच्या सुरूवातीला केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, 18 वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या कोरोना लसींच्या मानवी चाचण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. गुजरातमधील औषधी कंपनी झायडस कॅडिला यांनी सांगितले आहे की, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी औषधाची चाचणी घेण्यात आली आहे, ती 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना दिली जाऊ शकते. औषध कंपनी झायडस कॅडिलाने 1 जुलैला कोरोनाची लस ZyCoV-D (तीन डोस) चे आपत्कालीन वापरासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियासमोर मागणी केली होती. दोन डोसच्या लसीच्या मूल्यांकनाचा डेटा त्यांनी सादर केला. हा डेटा 28000 स्वयंसेवकांवर घेण्यात आलेल्या फेज -3 चाचणीचा निकाल होता.

कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असेल, IIT कानपूरचा दावादेशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेत येऊ नये आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. तसेच, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.