CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 01:46 PM2020-09-25T13:46:01+5:302020-09-25T14:04:09+5:30

ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे.  यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार  लक्षणांबाबात सांगण्यात आले आहे.

Coronavirus symptoms the most unusual side effects people report after covid diagnosis | CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

googlenewsNext

वाढत्या कोरोनाच्या प्रसारात कोरोनाची नवीन लक्षणं समोर यायला सुरूवात झाली आहे. संक्रमित झालेल्या अनेकांना सर्दी, खोकल्या व्यक्तीरिक्त अनेक लक्षणांचा सामना करावा लागत आहे. फक्त श्वसनसंस्थाच नाही तर शरीराच्या अनेक भागांवर कोरोना संक्रमणाचा परिणाम दिसून येत आहे. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबाबत सांगणार आहोत. ताप, कफ, श्वास घ्यायला त्रास होणं याव्यतिरिक्त आणखीही काही लक्षणं आहेत. याबाबत अधिक जागरूक  राहणं गरजेचं आहे.

प्रामुख्याने लक्षणं नसलेल्या रुग्णांनी अधिक सतर्कता बाळगायला हवी.  ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) संस्थेतर्फे दिशा निर्देश जारी करण्यात आले आहे.  यात कोरोना संक्रमित व्यक्तीच्या चार  लक्षणांबाबात सांगण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर ही लक्षणं २ ते ४ दिवसांमध्ये दिसून येतात. NHS च्या एडवायजरीनुसार ही लक्षणं एक दिवस किंवा एका दिवसापेक्षा जास्त तर अनेकदा संक्रमण पूर्ण कमी होईपर्यंत दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. 

डोळ्यांची समस्या

या एडवायजरीनुसार डोळे लाल होणं, डोळ्यांना सुज येणं ही कोरोना संक्रमणाची लक्षणं आहेत. याप्रकारात डोळ्यातून पाणी बाहेर येते, कधी डोळे लाल होतात, तर कधी सूज येते. तज्ज्ञांच्या मते ही लक्षणं सामान्य असली तरी गंभीर संक्रमण झाल्यास ही लक्षणं दिसून येतात. 

बेशुद्ध होणं

कोरोना संक्रमणामुळे मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो. त्यामुळे डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ही लक्षणं  कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. NHS नं दिलेल्या माहितीनुसार डोकेदुखी, थकवा येणं यासोबत अस्वस्थ वाटणं,  बेशुद्ध होणं ही स्थितीही उद्भवू शकते.  

सतत खोकला येणं

सुका खोकला येण्याची वेगवेगळी कारणं आहेत. सतत  खोकला येत असेल तर व्हायरसच्या संक्रमणाचं कारण असू शकतं.  UK च्या एका सर्वेमध्ये दिसून आलं की कोरोनामुळे संक्रमित असलेल्या एका रुग्णाला जवळपास चार  तासांपर्यंत  खोकला येण्याची समस्या उद्भवली होती. 

त्वचेच्या रंगात बदल होणं

कोरोनाचं संक्रमण झाल्यास त्वचेवर सुज येते अनेकदा चट्टे पडतात. त्वचेच्या  रंगात बदल  होणं हे कोरोना संक्रमणाचं लक्षण असू शकतं. अशी लक्षणं तरूणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. काहीवेळा पायांना जखम झाल्याप्रमाणे लक्षणंही दिसतात. 

काय करायला  हवं

अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. सुरूवातीची लक्षणं दिसत असल्यास स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्या. मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आणि सगळ्यात महत्वाचं वैयक्तिक स्वच्छेची काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय  कोणतंही औषध घेऊ नका. लवकरात लवकर चाचणी केल्यास योग्यवेळी उपचार करता येऊ शकतात. 

फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट

'पब्लिक हेल्थ इंग्लँड' (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. याशिवाय तज्ज्ञांनी हिवाळ्यात या आजारांचा धोका वाढणार असल्याची सुचना देण्यात आली होती.   या रिपोर्टनुसार दोन्ही इन्फेकशन्स एकाचवेळी उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला निरोगी  रुग्णाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धोका जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये याचवर्षी सगळ्यात मोठं लसीकरण केलं जाणार आहे. 'द गार्डियन' ने यासंदर्भातील माहिती दिली होती. 

एखाद्या व्यक्तीला फ्लू आहे की कोरोनाचं संक्रमण याची काळजी घ्यावी लागेल. PHE च्या रिपोर्टनुसार देशात २० जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत एकूण २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अनेकांना रुग्णाला फ्लू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही समस्या उद्भवल्या होत्या. यातील जास्तीत जास्त रुग्णांची स्थिती गंभीर होती. ४३ टक्के लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्याचं प्रमाण २७ टक्के होतं. 

फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरतं. कोविड १९ सुद्धा असाच पसरतो. फ्लूने संक्रमित असलेला व्यक्ती जवळपास एका आठवड्यानंतर बरा होतो. पण कोविड १९ असलेल्या व्यक्तीला या आजारातून बाहेर येण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो.  दरम्यान या दोन्ही आजारांमुळे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या  लोकांच्या जीवाला धोका असतो.   हिवाळ्याच्या वातावरण फ्लू जास्त पसरतो.  कोरोनाबाबत सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत. वैद्यकिय तपासणी केल्याशिवाय यातील फरक ओळखणं कठीण आहे.

हे पण वाचा-

खुशखबर! पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला कोरोनाची लस मिळणार; चीनी कंपनी 'सिनोवॅकचा' दावा

खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

Web Title: Coronavirus symptoms the most unusual side effects people report after covid diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.