शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: नियमित आढळणाऱ्या लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 07:08 IST

ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही यानंतर सुरू होते. म्हणून अशा कुठलीही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये

अमोल अन्नदाते

आपल्याला सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास, वास व चवीची क्षमता कमी होणे, जुलाब, उलट्या व श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे माहीत आहेतच; पण अशी काही वेगळी लक्षणे आहेत, जी कोरोनामध्ये दिसून येत आहेत.

यात सर्वात आश्चर्य आहे तापाशिवाय कोरोना. काही डॉक्टर ज्यांना कोरोना संसर्ग झाला त्यांना ताप आलाच नाही व इतर लक्षणे दिसून आली.

  • फक्त तीव्र स्वरूपाची डोकेदुखी.
  • तीव्र पाठदुखी व शरीरातील स्नायू दुखणे, त्यातच पायाचे खालच्या बाजूचे म्हणजे काफ मसल्स दुखणे.
  • फक्त थकवा येणे.
  • डोळे येणे.
  • सर्दी खोकला झालेला माणूस दर वेळी सर्दी खोकला झाल्यावर असतो तसा न राहता खूप जास्त थकल्यासारखा वाटणे व सुस्त वाटणे.
  • ज्येष्ठ व्यक्तींमध्ये झोप जास्त येणे किंवा सकाळी लवकर झोपेतून न उठणे. दिवसाही झोपल्यावर खूप वेळा उठवावे लागणे.
  • सांधेदुखी.
  • दोन दिवसांत तब्येत झपाट्याने बिघडणे व लघवी कमी होणे.
  • थकवा येऊन चेहरा निस्तेज वाटणे.

 

ही सर्व लक्षणे सुरुवात असून बऱ्याचदा ताप, खोकला, सर्दी ही यानंतर सुरू होते. म्हणून अशा कुठलीही वेगळी लक्षणे असल्यास लगेच घाबरून जाऊ नये; पण स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवावे व आयसोलेशन करावे. तपासणी अहवाल कदाचित निगेटिव्ह येईल, पण तोपर्यंत स्वत:वर लक्ष ठेवावे व विलगीकरणात राहावे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स