शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Omicron Variant : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटवर Pfizer च्या लसीचा परिणाम फारच कमी, लॅब टेस्टचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 11:47 AM

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला.

कोरोना व्हायरसचा (Corona virus) ओमायक्रॉन व्हेरिअंट  (Omicron Variant) आधीच्या डेल्‍टा व्हेरिअंटच्यातुलनेत किती धोकादायक आहे? यावर अद्यापही मंथन सुरूच आहे. यातच, ओमायक्रॉनसंदर्भात लसीवर एक अध्ययन करण्यात आले आहे. हे अध्ययन फायझर लसीवर दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका हेल्‍थ रिसर्च इंस्‍टिट्यूटने केले आहे. या अध्ययनात दावा करण्यात आला आहे, की फायझर लसीचे दोन डोस  ओमायक्रॉनविरोधात काही प्रमाणावरच प्रभावी आहेत. (Pfizer BioNTech effectiveness against Omicron)

या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. लसीचा बूस्टर डोस या व्हेरिअंटपासून संरक्षण करू शकतो, असेही या अभ्यासातून सुचविण्यात आले आहे. आफ्रिकेच्या हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अॅलेक्स सिगल यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट दिसून आली आहे. जी पूर्वीच्या कोविड स्ट्रेनपेक्षा अधिक आहे.

त्यांनी म्हटले आहे, की फायझर/बायोटेकची लस घेतलेल्या 12 लोकांच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यांतील, लसीचा डोस घेतलेल्या आणि कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिअंटची लागण झालेल्या 6 पैकी 5 लोकांनी ओमिक्रॉन व्हेरियंटला निष्प्रभ केले. एवढेच नाही, तर सिगल म्हणाले, मी जो विचार करत होतो, त्या तुलनेत जे निकाल आले आहेत ते खूपच सकारात्मक आहेत. आपल्याला जेवढी अँटीबॉडी मिळेल, ओमायक्रॉनचा सामना करण्याची संधी तेवढीच वाढेल.

तसेच, ज्या लोकांना लसीचा बुस्टर डोस मिळाला आहे, अशा लोकांची अद्याप प्रयोग शाळेत तपासणी झाली नाही. असे लोक अद्याप दक्षिण आफ्रिकेत नाही, असेही सिगल यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या