कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण जगभरातील लोकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. संशोधक कोरोनावर लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा कोरोना रुग्णांच्या उपचारासांठी वापर केला जात आहे.  कोरोनाचे उपचार शोधण्यासाठी ६ हजारांपेक्षा जास्त औषधांवर परिक्षण करण्यात आले होते.

या विशेष रिसर्च प्रोग्रामला संशोधकांनी कोविड मूनशॉट असं नाव दिलं आहे. स्पेनच्या रोविरा युनिव्हरसिटीतील संशोधकांनी कॉम्प्यूटर टेक्निकचा वापर करून ६ हजार  ४६६ औषधांवर परिक्षण केले.  त्यातील हे दोन ड्रग्स संक्रमणानंतरचं रेप्लिकेशन म्हणजेचं कोरोना विषाणूंची वाढती संख्या रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

स्पेनच्या रोविरा युनिव्हरसिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन औषधांमुळे कोरोना एंजाइम्सवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. कारण एंजाइम्समुळे विषाणूंची संख्या वाढते. रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तसंच व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते. 

कारप्रोफेन आणि सेलेकॉग्सिब

स्पेनच्या संशोधकांनी हा शोध इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलीक्यूलप सायन्समध्ये प्रकाशित केला आहे. त्यांच्यामते कारप्रोफेन आणि सेलेकॉग्सिब एंटी-इंफ्लेमेट्री ड्रग आहेत. या औषधांमधील एका औषधाचा वापर माणसांवर तर इतर औषधांचा वापर प्राण्यांवर केला जातो.  तज्ज्ञांच्यामते कोरोनाची लस तयार करण्यासाठी या शोधाचा वापर केला जाऊ शकतो. 

कसं काम करते हे औषधं

 कोरोना व्हायरसमध्ये एम-प्रो नावाचे एंजाइम असते. हे एंजाइम असं प्रोटीन्स तयार करत असतात. ज्यामुळे विषाणू शरीरात आपली संख्या वाढवत जातात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जातं तज्ज्ञांनी दावा केला आहे की,  या औषधामुळे एंजाइम्सना रोखता येऊ शकतं. या संशोधनात दिसून आलं की, कोरोनाने बाधित असलेल्या रुग्णांना ५० मायक्रोमोलर कारप्रोफेन दिल्यामुळे एम -प्रो एंजाईम जवळपास १२ टक्यांपर्यंत आणि सेलेकॉग्सिब दिल्यानंतर ४ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते.

रिपोर्टनुसार इतर देशांमध्येही असे ट्रायल सुरू आहे. ज्यांचे उद्दीष्ट एम-प्रो एंजाइमची वाढ थांबवणं हे आहे. ज्या औषधांना एचआयव्हीच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलं होतं.  असे  एंटी-रेट्रोवायरल ड्रग लेपिनोविर आणि रिटोनाविर सुद्धा फायदेशीर ठरू शकतात अशी बाब समोर आली आहे. WHO ने सुद्धा या औषधांच्या चाचणीसाठी मदत दर्शवली आहे. 

रक्त, लघवीच्या माध्यमातून पसरतोय कोरोना? पावसाळ्यात संसर्गाचा धोका किती; जाणून घ्या

फक्त इन्फेक्शन रोखण्यासाठी नाही; तर कोरोनाला नष्ट करण्याासाठी प्रभावी आहे 'ही' गोष्ट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus : Scientist claims 2 drugs out of 6466 medicines are effective in treatment myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.